एक्स्प्लोर

हरिश रावतांची भाजपला धोबीपछाड, उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत

देहरादून: भाजपचा उतावीळपणा उत्तराखंडमध्ये अंगाशी आला. कारण काँग्रेसच्या हरिश रावत यांनी भाजपला अक्षरश: तोंडावर पाडलं आहे. बहुमत चाचणीत निर्भेळ बहुमत मिळवून, हरिश रावत यांनी मोदी सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लादून अततायीपणा केल्याचं दाखवून दिलं.   बहुमत चाचणीत काँग्रेसला तब्बल 33 मतं मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा हरिश रावत उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.   या निमित्ताने गेले काही महिने उत्तराखंडात सुरु असलेली राजकीय अनिश्चितता आज अखेर संपुष्टात आल्याचं चित्र आहे.   सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तराखंडातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.   बहुमत चाचणीचा औपचारिक निकाल आज जाहीर करण्यात आला. हा निकाल सभापतींनी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यानंतर न्यायालयाने  हरिश रावत पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळू शकतात असे निर्देश दिले. त्यामुळे 9 बंडखोर काँग्रेस आमदरांच्या बळावर राज्यात सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला यामुळे चांगलाच धक्का बसला आहे.   काय होता उत्तराखंडमधील वाद? उत्तराखंड विधानसभेत 70 आमदार आहेत. त्यातील 36 काँग्रेसचे तर 28 जण भाजपचं प्रतिनिधित्व करतात. तर इतर पक्षांचे 6 आमदार आहेत.   काँग्रेसच्या 9 आमदारांनी बंड केल्याने हरीश रावत सरकार अस्थिर झालं होतं. 27 मार्चला रावत सरकारला बहुमत सिद्ध करायचं होतं, पण ती संधी न देताच केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती, असा आरोप आहे. त्याविरोधात हरीश रावत सरकारने हायकोर्टात धाव घेतली होती.   यावर नैनीताल हायकोर्टाने 21 एप्रिलला राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 एप्रिलला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.   भाजपने घोडेबाजार करुन काँग्रेस आमदारांना फोडण्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यासाठी प्रत्येक आमदाराला 25 लाख रुपये दिल्याचा आरोप हरिश रावत यांनी केला होता.   त्यामुळे बंडखोर आमदारांना बहुमतावेळी मतदान करता येऊ नये अशी मागणी रावत यांनी केली होती, त्याला हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला.   यानंतर मंगळवारी बहुमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान 9 आमदारांना मतदानापासून दूर ठेवण्यात आलं.

संबंधित बातम्या

उत्तराखंडमध्ये रावतांचीच बाजी, काँग्रेसला 34 मतं : सूत्र

उत्तराखंडमध्ये ट्विस्ट, 9 बंडखोर आमदारांची याचिका फेटाळली..

भाजपचा उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या 9 आमदारांच्या जोरावर सत्तास्थापनेचा दावा

उत्तराखंडमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवली

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम

जनताच मोदी सरकारला पाणी पाजेल, सोनियांचा हल्लाबोल

 

महत्त्वाच्या बातम्या

20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
Embed widget