एक्स्प्लोर

Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...

Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': अक्षय कुमारमुळेच मी 'OMG 2' नाकारला, 'OMG 2' ची स्क्रिप्ट मुळात माझी होती, पण स्क्रिप्टमध्ये मोठे बदल केले, मला साधं क्रेडिटही दिलं गेलं नाही, असं परेश रावल म्हणालेत.

Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': बॉलिवूडचे (Bollywood News) प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) सध्या चर्चेत आहेत, ते त्यांनी केलेल्या काही खळबळजनक खुलाशांमुळे. अभिनेते परेश रावल (Actor Paresh Rawal) यांनी दावा केलाय की, 'OMG 2' ची स्क्रिप्ट मुळात त्यांनी दिग्दर्शक अमित राय यांच्या सहकार्यानं लिहिलेली. पण, तरीसुद्धा या स्क्रिप्टचं किंवा संकल्पनेचं श्रेय त्यांना अजिबातच देण्यात आलेलं नाही. अक्षय कुमार या प्रोजेक्टमध्ये सामील झाल्यानंतर स्क्रिप्टमध्ये मोठे बदल करण्यात आले आणि त्यामुळेच त्यांनी या सिनेमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी नमूद केलंय.

विक्की लालवानीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना परेश रावल यांनी स्पष्ट केलं की, त्यांची मूळ स्क्रिप्ट ही पिता-पुत्र यांच्यातील संबंधांवर आधारित एक 'फॅमिली ड्रामा'  होती. ज्यामध्ये लैंगिक शिक्षण, सार्वजनिक मानहानी आणि न्यायासाठी पालकांचा लढा यांसारख्या विषयांचा समावेश होता. या कथेत देव किंवा कोणत्याही दैवी पात्राचा समावेश नव्हता आणि ती कधीही OMG चा थेट 'सीक्वल' म्हणून लिहिली गेली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं.

साधं क्रेडिटसुद्धा दिलं गेलं नाही : परेश रावल (Paresh Rawal On Akshay Kumar)

परेश रावल यांनी सांगितलं की, सर्वात निराशाजनक बाब म्हणजे, सिनेमाच्या मूळ कल्पनेसाठी त्यांना अजिबातच कोणतंही क्रेडिट देण्यात आलं नाही. ते म्हणाले की, "सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे, मला त्या कथेचं किंवा संकल्पनेचं श्रेयही दिलं गेलेलं नाही. माझा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही..."

अभिनेत्यानं असाही दावा केलाय की, सिनेसृष्टीतील अनेक लोकांना या कथेच्या मूळ स्त्रोतांबद्दल माहिती होती. परेश रावल पुढे बोलताना म्हणाले की, "अमित, अक्षय कुमार (Akshay Kumar), अश्विन, अजय देवगण (Ajay Devgn), करण जोहर (Karan Johar) आणि सलमान खान (Salman Khan) या सर्वांना माहीत होतं की, ती माझी कल्पना आणि माझी स्क्रिप्ट होती. कदाचित अजय आणि सलमान यांनी विषयामुळे हा प्रकल्प नाकारला असावा, त्यांना तो विषय वादग्रस्त वाटला असावा. मी त्यांना ती संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला..."

परेश रावल यांनी सांगितलं की, त्यांनी दिग्दर्शक अमित राय यांच्याशी संपर्क साधलेला, ज्यांच्या 'रोड टू संगम' (Road to Sangam) सिनेमाचं ते खूप कौतुक करत असत, आणि त्यांना आपली प्राथमिक कल्पना सांगितली होती. त्यांनी स्पष्ट केलं की, ही कथा एका शाळकरी मुलाभोवती फिरते. त्या मुलाची एक प्रायवेट कृती रेकॉर्ड होऊन व्हायरल होते, ज्यामुळे त्याला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, त्याचे वडील त्याचा बचाव करण्याचा आणि मुलावर लादल्या गेलेल्या या अपमानाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात.

पुढे बोलताना परेश रावल यांनी सांगितलं की, अक्षयनं नंतर या सिनेमात काम करण्याची विनंती केली होती, पण त्यांनी अक्षयची ती ऑफर नाकारली, कारण सिनेमाची कथा त्यानं विकसित करण्यात मदत केलेल्या कथेसारखी नव्हतीच.

... म्हणून अक्षय कुमारची ऑफर नाकारली (Paresh Rawal On 'OMG 2')

परेश रावल म्हणाले की, "मी अक्षयशी बोललो. त्यानं मला हा चित्रपट करण्यास सांगितलं. मी त्याला म्हणालो, "नाही. हा तो सिनेमा नाही, ज्याची मी कल्पना केली होती. या कथेत ईश्वराची काहीच भूमिका नाही..." त्यानं माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण मी सुरुवातीपासूनच या पटकथेच्या प्रक्रियेत सहभागी होतो. ती कथा नेमकी कशी असायला हवी होती, हे मला पक्कं ठाऊक होतं. म्हणूनच मी यातून माघार घेतली..." अखेर, वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली, तर अक्षय 'शिवाचा दूत' म्हणून पडद्यावर दिसला.

दरम्यान, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओएमजी 2' (OMG 2) सिनेमाला, लैंगिक शिक्षण आणि धार्मिक विषय यांच्या मिश्रणामुळे CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कडून कठोर छाननीला सामोरं जावं लागलं. अक्षयच्या पात्राचं चित्रण भगवान शिव यांच्याऐवजी एका दैवी दूताच्या रूपात करणं यांसारखे अनेक बदल केल्यानंतर, अखेरीस या सिनेमाला 'A' प्रमाणपत्र देऊन मंजुरी देण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: 'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget