एक्स्प्लोर

Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा

Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला. त्यावेळी तिच्या या निर्णयाची बरीच चर्चा झालेली.

Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: सध्या जिकडे तिकडे चर्चा रंगलीय ती, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' (Deool Bandh 2) सिनेमाची. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा गल्ला केलाय. साधारणतः 10 वर्षांपूर्वी या सिनेमाचा पहिला भाग 'देऊळ बंद' (Deool Bandh) रिलीज करण्यात आलेला. त्या सिनेमालाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालेला. या सिनेमात गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आणि मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकलेला. या सिनेमात एक चिमुकली होती, जिनं केलेल्या चुकीभोवती सिनेमाची कथा फिरत होती. सिनेमातल्या राघव शास्त्रीच्या मुलगी सना. म्हणजेच, अभिनेत्री आर्या घारे (Actress Aarya Ghare). आता आर्या एवढी बदलीय की, तिला ओळखणंही शक्य होत नाहीय. आर्यानं नुकतीच एक मुलाखत दिलीय. त्यावेळी तिनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यातल्या एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 

मराठी अभिनेत्री आर्या घारे (Marathi Actress Aarya Ghare) हिनं मुलाखतीत बोलताना आपल्या वाढदिवसाची आठवण सांगितली. आर्यानं तिचा एक वाढदिवस चक्क स्मशानभूमित साजरा केलेला. आर्यानं नेमकं असं का केलं? त्यावेळी नेमकं काय घडलेलं? याचा सविस्तर प्रसंग तिनं सांगितला. नेमकं आर्या काय म्हणाली? सविस्तर सांगूयात...

'देऊळ बंद' फेम अभिनेत्री आर्या घारे नेमकं काय म्हणाली? (Aarya Ghare Celebrated Birthday At Cremation)

इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीती बोलताना अभिनेत्री आर्या घारे म्हणाली की, "मी माझा बर्थडे स्मशानभूमीमध्ये सेलिब्रेट केलेला. माझा वाढदिवस 9 ऑगस्टला असतो, 6-7 ऑगस्टला मी एक आर्टिकल वाचलं होतं, ज्यात नागपूर की, नाशिकमध्ये पाच वर्षाच्या मुलीचा जीव गेला... कारण तिचे आई-बाबा आणि मावशीला वाटलेलं की, तिच्या अंगात भूत आहे. त्यामुळे त्यांनी त्या लहान मुलीला इतकं मारलं की, त्यांच्या मते मारल्यावर ते भूत तिला सोडून जाईल... पण त्या मुलींनं आपला जीवच सोडला. मी ते आर्टिकल वाचलं आणि माझं असं झालं की, हे काय चालू आहे. कुठे चाललोय आपण... ठीक आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा गोष्टी असतात, पण आपण त्याचा एवढा बाऊ नाही केला पाहिजे..." 

Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा

"तेव्हा मी माझ्या मम्माला म्हणाले की, मला मला स्मशान भूमीमध्ये माझा बर्थडे सेलिब्रेट करायचाय. यावर ती मला म्हणाली नाही...! तू वेडी आहेस का? तू पागल आहेस का? बावळट आहेस का...? ती काही ऐकायला तयार नव्हती, त्यामुळे मी एक पोस्ट बनवली आणि 8 ऑगस्टला माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर ती अपलोड केली की, मी उद्या स्मशानभूमीमध्ये माझा वाढदिवस साजरा करतेय. जर तुम्ही मला सपोर्ट करत असाल तर या... ती पोस्ट माझ्या आईनं पण बघितली, त्यानंतर ती मला खूप ओरडली... पण मी तिला म्हटलं की, आता पोस्ट मी टाकली, त्यामुळे मला तिथे जावंच लागेल आणि माझा वाढदिवस साजरा करावाच लागेल. मग आई पण म्हणाली ठीक आहे, तू आता टाकली असणार मग कर तिथे सेलिब्रेट मी आहे तुझ्यासोबत...", असं आर्या घारे म्हणाली. 

पुढे बोलताना आर्या घारेनं सांगितलं की, "मग दुसऱ्या दिवशी मी भोसरी येथे स्मशानभूमी आहे, तिथे मी माझा बर्थडे सेलिब्रेट केलाय. त्या वाढदिवसाला माझ्या नातेवाईकांपेक्षा पत्रकार लोक जास्त होते. केवळ मराठी हिंदीच नव्हे, तर साऊथ कडील चैनलमध्ये सुद्धा ती न्यूज लावली होती..."

"तरीही आपल्याला तिथेच मुक्ती का मिळते?"

"असं म्हणतात की, स्मशानभूमीत निगेटिव्ह एनर्जी असते. आपण कोणाच्या मयताला जरी गेलो, तरी घरी येऊन अंघोळ करतो, कारण ती निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असू नये. पण मला कळत नाही की, तिथे काय निगेटिव्ह एनर्जी असेल? आणि जर असली तरीही आपल्याला तिथेच मुक्ती का मिळते? स्मशानभूमीत तुम्ही श्रीमंत आहात गरीब आहात, उंच की बुटके आहात? हे काहीच विचारत नाही. अंतिम सत्य तेच आहे... काहीही झालं तरी शेवटी तुम्हाला तिथेच जायचंय. तुम्हाला जर तिथे मुक्ती भेटत असेल तर ते ठिकाण निगेटिव्ह कसं? एक भारतातील तरुणी म्हणून पुढे येऊन कोणीतरी बोललं पाहिजे होतं की, श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नको म्हणून मी हे केलं... मला या गोष्टीची भयंकर चीड आहे की, कोणीही अंधश्रद्धा ठेवू नये...", असं आर्या घारे म्हणाली. 

आर्याने पुढे सांगितलं की, "या गोष्टीनं मी खूपच ट्रोल झालेले. कमेंटमध्ये काहींनी लिहिलेलं की, लग्नसुद्धा स्मशानातच कर वगैरे... पण मी आधी म्हटल्याप्रमाणे मी सगळ्यांच्या मतांचा आदर करते, पण मला हे करायचं होतं... कदाचित मला या मार्गानेच तुमच्यापर्यंत पोहोचता आलं असतं, त्यामुळे मी स्मशानात बर्थडे केला. तो एकच बर्थडे मी तिथे केलेला, पण एरव्ही मी कधीच माझा बर्थडे पार्टीसारखा सेलिब्रेट करत नाही. माझे जास्त फ्रेंड्स नाहीत. नेहमी माझा बर्थडे गोशाला, अनाथाश्रम, अंध व्यक्तींसोबत सेलिब्रेट केलेत..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget