एक्स्प्लोर
हातात रिव्हॉल्वर आणि रायफल घेऊन डान्स करणाऱ्या आमदाराची भाजपमधून हकालपट्टी
वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे उत्तराखंडमधील खानपूरचे भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एका सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. शिस्तभंगाच्या आरोपांनंतर भाजपने त्यांना आधीच निलंबित केलं होतं.
देहराडून : उत्तराखंडमधील 'रंगेल' आमदार कुंवर प्रणव सिंहची भाजपने पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी केली आहे. कुंवर प्रणव सिंहचा हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन दारू पिऊन नाचतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत आमदार कुंवर प्रणव सिंह गाण्यावर एका हातात एक-दोन नाही तर तीन रिव्हॉल्वर आणि दुसऱ्या असॉल्ट रायफल नाचवत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये कुंवर प्रणव सिंह एक एक करुन शस्त्र आपल्या हाती घेत दारुही पिताना दिसत आहे, तसंच अपशब्दही उच्चारताना दिसून आला होता.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने या आमदाराला कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली होती. भाजपचे उत्तराखंडचे प्रभारी श्याम जाजू यांनी सांगितले की, या याप्रकरणी दबाव तंत्राचा प्रश्न नाही तर कार्य पद्धती कशी असावी हा सवाल आहे. नेत्यांना सार्वजनिक जीवन कसे जगावे हे शिकायला हवे. याचमुळे कुंवर प्रणव सिंह यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. आमच्या पक्षात अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, हा संदेश या कारवाईनंतर दिला गेला आहे.
वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे उत्तराखंडमधील खानपूरचे भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एका सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. शिस्तभंगाच्या आरोपांनंतर भाजपने त्यांना आधीच निलंबित केलं होतं. परंतु यानंतर कुंवर प्रणव सिंह यांचा गाण्यावर एका हातात एक-दोन नाही तर तीन रिव्हॉल्वर आणि दुसऱ्या असॉल्ट रायफल नाचवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये कुंवर प्रणव सिंह एक एक करुन शस्त्र आपल्या हाती घेत असल्याचे दिसत आहे. यासोबतच दारुही पिताना दिसत आहे. तसंच अपशब्दही उच्चारत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार कुंवर प्रणव सिंह यांच्यासोबत आणखी काही लोक दिसत आहेत. ते देखील नाचत आहेत, गात आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. कुंवर प्रणव सिंह यांचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी जून महिन्यात त्यांचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात त्यात पत्रकाराशी असभ्य वर्तन केलं होतं. याचीच दखल घेऊन पक्षाने त्यांच्या कारवाई केली आणि शिस्तभंगाच्या आरोपात तीन महिन्यांसाठी निलंबित केलं होतं. आता या व्हिडीओनंतर मात्र पक्षाने या 'रंगेल' आमदाराची सरळ कायमस्वरुपी हकालपट्टी केली आहे.हथियारों संग नाचते ये #BJP के उत्तराखंड से विधायक कुँवर प्रणव सिंह चैंपियन है.. हैं न सचमुच में चैंपियन. @abpnewshindi pic.twitter.com/m4O0SKy1aP
— Pankaj Jha (@pankajjha_) July 10, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement