एक्स्प्लोर
उत्तराखंडमध्ये टेम्पो-ट्रॅव्हलर दरीत कोसळली, महाराष्ट्राच्या 4 जणांचा मृत्यू 6 जखमी

फोटो सौजन्य : एएनआय
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यानं झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले आहेत. यमुनेत्रीहून केदारनाथला जाताना हा अपघात झाला.
आज सकाळी अमरावतीतील कुटुंब केदारनाथ यात्रेसाठी यमुनेत्रीहून निघालं होतं. यावेळी एलकेसी मोटर मार्गावरील चंगोर बंद जवळ टेम्पो-ट्रॅव्हलर दरीत कोसळली. या अपघातात अमरावतीचे चंद्रकांत सीताराम कारकर, कुंदादेवी चंद्रकांत कारकर, मीना सुधाकर मुरारी, संजय पाटील या चार यात्रेकरुंचा मृत्यू झाला.
तर अपघातात एकूण सहाजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सतीश राऊत, अर्चनादेवी राऊत, आर्या राऊत,पौर्णिमा वैभव, सुधाकर राऊत यांचा समावेश आहे. जखमींवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.Uttarakhand: 4 dead, 6 injured after a mini bus met with an accident, in Tehri Garhwal district's Ghansali; rescue operation underway pic.twitter.com/JlsqyWzwWd
— ANI (@ANI_news) May 6, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
