एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर
लखनौ : भाजप कार्यकर्त्यांच्या मुजोरीला न जुमानता ड्युटी बजावणारी 'मर्दानी' महिला पोलिस अधिकारी उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली आहे. पोलिस मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गराड्यातही या लेडी पोलिस ऑफिसरने आपलं कर्तव्य पार पाडलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सर्कल ऑफिसर श्रेष्ठा ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या कार्यकर्त्यांची मुजोरी सहन न करता चोख उत्तर दिलं. भाजप नेते प्रमोद लोधी यांच्याकडे गाडीची कागदपत्रं नसल्यामुळे त्यांचं चलान म्हणजेच दंड आकारण्यात आला. याविरोधात भाजप समर्थकांनी गुंडगिरी करत श्रेष्ठा ठाकूर यांना जाब विचारला.
'तुम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जा आणि पोलिसांना वाहनं तपासण्याचा कोणताही अधिकार नाही, हे लेखी आणा' असं उत्तर ठाकूर यांनी लोधी यांना दिलं. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचं नाव बदनाम होतं, अशा शब्दात श्रेष्ठा यांनी खडे बोल सुनावले.
'आम्ही पोलिस कर्तव्य बजावण्यासाठी तासन् तास उभे राहतो, हौस म्हणून नाही.' असं म्हणत उपस्थितांची बोलती बंद केली.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement