एक्स्प्लोर
प्रियकरासोबत पळाल्याने तरुणीवर भाऊ-वडील-काकांचा गँगरेप
एका नर्सिंग होममध्ये आपला भाऊ, वडील आणि दोन काकांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : एकीकडे, कोपर्डीतील चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा सुनावली गेली असतानाच उत्तर प्रदेशातून नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून तरुणीवर तिचा सख्खा भाऊ, वडील आणि दोन काकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप होत आहे.
मुझफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीच्या आरोपांमुळे उत्तर प्रदेश हादरलं आहे. पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
यूपीतील धानेदा गावात राहणारी 21 वर्षीय तरुणी त्याच गावातील 32 वर्षीय तरुणासोबत दोन वेळा पळून गेली होती. दोन्ही वेळा म्हणजे जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अपहरणाची तक्रार नोंदवली. प्रकरण कोर्टात गेल्यावर तरुणीने प्रियकराच्या बाजूने साक्ष दिली. आपण मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचं सांगितल्याने आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली.
वेदना हीच शक्ती समजा आणि लढा: दिल्लीच्या निर्भयाच्या आईचा सल्ला
2 नोव्हेंबर रोजी तरुणी अलाहाबाद कोर्टात धाव घेतली. एका नर्सिंग होममध्ये आपला भाऊ, वडील आणि दोन काकांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. प्रियकरापासून आपल्या गर्भात वाढणारं मूल पाडण्याचे प्रयत्न कुटुंबीयांनी केल्याचा दावाही तिने केला.कोपर्डीचा निकाल: तिघांनाही फाशीची शिक्षा
आरोपींवर कलम 376 ड (सामूहिक बलात्कार) आणि 313 (महिलेच्या परवानगीशिवाय गर्भपात) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणीच्या आईने आपलं कुटुंब निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपल्या मुलीने तिच्या बॉयफ्रेण्डच्या दबावाखाली कुटुंबीयांविरोधात तक्रार दिल्याचा आरोप तिने केला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement