एक्स्प्लोर

'योगी कट'वरुन यूपीत कटकट, शाळेच्या फर्माननंतर विद्यार्थ्यांचा राडा

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे केस कापण्याचं फर्मान सोडलं आहे. परंतु शाळेच्या या आदेशाचा अनेक पालकांनी तीव्र विरोध केला आहे. मोठे केस आणि दाढी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यास शाळेच्या व्यवस्थापनाने मज्जाव केला. इतकंच नाही तर डब्ब्यात मांसाहार आढळल्यास त्याला शाळेबाहेर काढलं जाईल, असे निर्देशही देण्यात आले आहेत. शाळा धर्माच्या आधारावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला जात आहे. ऋषभ अकॅडमीच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना 'योगी कट' करण्याचं फर्मान सोडलं आहे. परंतु अनेक पालकांनी या आदेशाला विरोध केला आहे. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरण सोडवत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. वेस्ट एंड रोडवर असलेल्या ऋषभ अकॅडमीमध्ये गुरुवारी नेहमीप्रमाणे पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आले होते. पण एक विशेष धर्माच्या पालकाने आरोप करत गोंधळ घातला की, शाळेचे सचिव रणजीत जैन आपल्या मुलांना केसांचा 'योगी कट' करण्यासाठी दबाव टाकत आहेत. पालकांचं म्हणणं होतं की, ज्या मुलांनी 'योगी कट' केला नाही आणि दाढी वाढलेली आहे, त्यांना शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. शिवाय मुलांनी 'योगी कट' करावा यासाठी वर्गात कोणत्याही कारणाने छळ केला जात आहे." "जर विद्यार्थ्यांचे केस छोटे करायचेच होते, तर त्यांना केसांचा फौजी कट करण्यासाठीही सांगितलं जाऊ शकलं असतं," असं मतही पालकांनी व्यक्त केलं. दरम्यान, शाळेचे सचिव रणजीत जैन यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे केस छोटे आहेत, त्यामुळे विद्यार्थीही त्यांच्यासारखे केस कापू शकतात. मी विद्यार्थ्यांना केवळ केस छोटे करण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी सांगितलं होतं," असं रणजीत जैन म्हणाले. "या निर्णयामागे विद्यार्थ्यांना शिस्तबद्द पद्धतीने शिक्षण देण्याचा उद्देश होता," असं सचिवांनी सांगितलं. शिवाय शाळेत आधीपासूनच मांसाहारी पदार्थ आणण्यास मनाई आहे. यासाठी या प्रकरणाला धार्मिक रंग देणं चुकीचं असल्याचं जैन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget