UP Election 2022 : 'सिंपल डिंपल' अखिलेशला भावली अन्.... जाणून घ्या अखिलेश यादवांची भन्नाट लव्ह स्टोरी
राज्याच्या राजकारणात वादळ आलं असतानाही अखिलेश यादवांनी हार न मानता आपलं प्रेम मिळवलंच. अखिलेश यादव आणि डिंपल रावत यांची लव्ह स्टोरी अशी वेगळीच होती.
![UP Election 2022 : 'सिंपल डिंपल' अखिलेशला भावली अन्.... जाणून घ्या अखिलेश यादवांची भन्नाट लव्ह स्टोरी Uttar Pradesh Assembly Election 2022 know the love story of akhilesh yadav and Dimple Yadav UP Election 2022 : 'सिंपल डिंपल' अखिलेशला भावली अन्.... जाणून घ्या अखिलेश यादवांची भन्नाट लव्ह स्टोरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/ee49888d4e08ca34838897f38b848adb_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनौ: समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि डिंपल रावत... देशाच्या राजकारणातलं वन ऑफ द मोस्ट फेव्हरेट कपल्स. अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्या राज्याच्या इतिहासातलं सर्वात पॉवरफूल कपल म्हणून यांची ओळख होती. पण, या दोघांची लव्ह स्टोरी प्रचंड फिल्मी आहे. म्हणजे त्यावर एक भन्नाट चित्रपटच होऊ शकतो.
प्यार दोस्ती है...
प्रेमाची ही कहाणी सुरु झाली आजपासून 27 वर्षांपूर्वी. 21 वर्षांचे अखिलेश त्यांच्या एक मित्राकडे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे 17 वर्षांच्या डिंपल रावत यांच्याशी त्यांची भेट झाली. इतर कॉमन फ्रेण्ड्समळे हे दोघे मित्र होतात...त्यांची मैत्री चांगलीच घट्ट होते... दोघेही वेगवेगळ्या कारणांनी भेटत राहतात आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं.
मात्र चित्रपटांप्रमाणेच यांच्या लव्ह स्टोरीमध्येहीदोन वेळा ट्विस्ट आले. पहिला ट्विस्ट होता तो दोघंही वेगळं होण्याचा. शिक्षणासाठी अखिलेश यादव सिडनीला गेले आणि डिंपल रावत भारतातच राहिल्या. दोघांमध्ये अंतर आलं. पण, हे अंतर फक्त शहरांमधलं होतं. कारण दोघेही मनानं एक झाले होते. तो जमाना आजच्या सारखा मोबाईलचा नव्हता तर लव्ह लेटरचा होता. अखिलेश आणि डिंपल यांनी एकमेकांना पत्र लिहून हृदयातल्या प्रेमाची ठिणगी जिवंत ठेवली.
वेगळ्या उत्तराखंडसाठी आंदोनल अन लव्ह स्टोरीमध्ये ट्विस्ट
चार वर्षांचा अभ्यास झाल्यानंतर अखिलेश भारतात परतले आणि त्यांच्या लव्ह स्टोरीत दुसरा ट्वीस्ट आला. अखिलेश यादवांनी आपल्या प्रेमाची गोष्ट मुलायम सिंह यादवांना सांगितली. पण नेमकं त्याच काळात उत्तर प्रदेशात एक मोठं आंदोलन सुरु होतं ते म्हणजे उत्तराखंड विभाजनाचं. आता तुम्ही म्हणाल याचा आणि अखिलेश-डिंपलच्या लव्ह स्टोरीचा संबंध काय..?
डिंपल रावत यांचा जन्म उत्तराखंडमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरी झाला. तीन बहिणींमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या डिंपल यांचं शिक्षणही लखनौमध्ये झालं. घरात राजकारणाची साधी चर्चाही होत नसायची. अशा कुटुंबांत त्या वाढल्या. जेव्हा अखिलेश यांच्या प्रेमात पडल्या तेव्हा अखिलेश यादव राजकारणातही सक्रिय नव्हते. बरं, दोघांच्या लग्नाच्या आड येणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे जात आणि वेगळ्या उत्तारखंडसाठीचंआंदोलन.
या सगळ्या अडचणी कमी म्हणून की काय.. त्याचकाळात तिरंगा चित्रपट प्रदर्शित झाला., आणिलष्करी अधिकारी आणि नेत्यांमध्ये कसा संघर्षअसतो... हा विचार चित्रपटातून सर्वसामान्यांच्यामनात टाकला... त्यामुळे अखिलेश आणि डिंपलयांच्या लग्नात आणखी अडचणी येत होत्या...त्याच काळात दोघे चोरून भेटायचे.
जात आणि प्रांतवाद लग्नाच्या आड
उत्तराखंड निर्मिती आंदोलनामुळे झालेला विरोध लक्षात घेत मुलायम सिंह आधी या लग्नासाठी तयार नव्हते. दुसरं महत्वाचं कारण होते ते म्हणजे लग्नामागचं जातीय समीकरण. हे सगळं सुरु असताना अखिलेश यांना मनवण्याची जबाबदारी होती ती काका शिवपाल यादव यांच्यावर. सगळ्यांनी अखिलेश यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, सगळ्यांना अखिलेश-डिंपल यांच्या प्रेमासमोर झुकावं लागलं. आणि अनेक अडचणींनंतर 24 नोव्हेंबर 1999 रोजी या दोघांचं लग्न झालं.
सन 2012 साली अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. तर त्याच वर्षी डिंपल यादव यांनी लोकसभेत एंट्री केली. एकीकडे शांत, संयमी, निखळ सौंदर्य तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचा सर्वात तरुण मुख्यमंत्री. पाच वर्षं दोघांनी नेटानं उत्तरप्रदेशचा गाडा हाकला. 2013 साली मुझफ्फरनगरमध्ये जातीय दंगली झाल्या त्या वेळी डिंपल यांनी अखिलेश यादवांना चांगलीच साथदिली.
2017 सालचा दारुण पराभव असो की 2019 मध्ये मिळालेली हार असो, डिंपल यांनी अखिलेश यादवांची साथ कधीच सोडली नाही. जितक्या नेटांनं दोघांनी आपला संसार सुरु केला होता तितक्याच नेटानं दोघे आजही उभे आहेत, चालत आहेत. या दोघांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहिरातीत अखिलेश यादव संपूर्ण कुटुंबासह समोर आले. पण, त्यात मुलायमसिंह मिसिंग होते. 2012 साली जिथं मुलायमसिंह सोबत होते तिथं आता डिंपल होत्या. आता 2022 सालीही अखिलेश-डिंपल ही जोडी तशीच उभी आहे.
कदाचित अशी लव्ह स्टोरी भारताच्या राजकीय इतिहासात कधीच झाली नसावी.
संबंधित बातम्या :
- UP Election 2022 : जेव्हा अखिलेश यादव अमित शाहांना फॉलो करतात!....म्हणून शरद पवार अखिलेश यांच्या पाठिशी!
- Uttar Pradesh: फुटबॉलर ते सर्वात तरुण मुख्यमंत्री...; म्हणून अखिलेश यांचं नाक वाकडं! जाणून घ्या काय आहे किस्सा
- यादव कुटुंबात गृहकलह अन् मुख्यमंत्री अखिलेश यादवांचीच पक्षातून हकालपट्टी... जाणून घ्या काय आहे तो किस्सा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)