US Student Visa Appointments for Indians : भारतीयांसाठी अमेरिका स्टुडंट व्हिसा अपॉइंटमेंट 30 टक्क्यांनी वाढवणार
अमेरिकन दूतावासाने गेल्यावर्षी एकूण 1.25 लाख भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर केला. सप्टेंबर 2022 पर्यंत, ही संख्या 82,000 होती. मात्र, दूतावासाने 1.25 लाख विद्यार्थी व्हिसा देण्याचा विक्रम केला आहे.
US Student Visa Appointments for Indians : अमेरिकेकडून (America) भारतीय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व्हिसाच्या भेटींची संख्या (visa appointments) 30 टक्क्यांनी वाढवण्याची योजना आहे. भारत हा यूएसमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या आघाडीच्या देशांपैकी एक बनला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी यूएस स्टुडंट व्हिसा अपॉइंटमेंट वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता येईल.
विद्यार्थ्यांसाठी व्हिसा अपॉइंटमेंटमध्ये 30 टक्क्यांनी वाढ होणार
छत्रपती संभाजीनगर भेटीदरम्यान अमेरिकेचे कौन्सुल जनरल माईक हॅन्की यांनी सांगितले की, येत्या वर्षभरात भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा अपॉइंटमेंटमध्ये 30 टक्क्यांनी वाढ केली जाईल. गेल्यावर्षी आम्ही 1.25 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठवले. एका वर्षात भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत जाण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आणि विद्यार्थी पाठवणारा भारत हा आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित केला. या वर्षी आम्ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, अमेरिकन अधिकारी उन्हाळ्यातील प्रवेशांसाठी 30 टक्क्यांनी भेटींची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत. आम्ही आणखी भारतीय विद्यार्थ्यांचे यूएसएमध्ये स्वागत करू अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले. हॅन्की यांनी आपल्या भेटीदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीयांसाठी यूएस स्टुडंट व्हिसा अपॉइंटमेंट्स 30 टक्क्यांनी वाढवल्या जाणार आहेत. अमेरिकन सरकारने देखील अलीकडेच स्टुडंट व्हिसा आणि टुरिस्ट व्हिसासह काही व्हिसा अर्जांसाठी प्रक्रिया शुल्क वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
ब्रिटनमध्येही भारतीय चिनी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त
अमेरिकन दूतावासाने गेल्यावर्षी एकूण 1.25 लाख भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर केला आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत, ही संख्या 82,000 होती. मात्र, दूतावासाने 1.25 लाख विद्यार्थी व्हिसा देण्याचा विक्रम केला. अमेरिका हा एकमेव देश नाही जिथे भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ब्रिटनमध्येही जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय विद्यार्थ्यांची संख्या यूकेमधील (United Kingdom) चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांसाठी आता व्हिसासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अमेरिकेने व्हिसा दरात वाढ केली असून व्हिसाचे नवीन दर 30 मे 2023 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते पर्यटनापर्यंत जाऊ इच्छिणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे. विशिष्ट नॉन-इमिग्रंट व्हिसा अॅप्लिकेशन (NIV) प्रक्रिया शुल्कात वाढ करण्याबाबत यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटने याबाबत प्रसिद्धीपत्रकातून माहिती दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या