Kia Carens India Launch : कियाची 7 सीटर 'कॅरेन्स कार' भारतात लॉन्च, कमी किंमतीत मिळणार दमदार फीचर्स
Kia Carens India Launch : कियाने भारतात आपली 7 सीटर कार 'कॅरेन्स' (Kia Carens) लॉन्च केली आहे.
Kia Carens India Launch : कियाने भारतात आपली 7 सीटर कार 'कॅरेन्स' (Kia Carens) लॉन्च केली आहे. या कारची प्रारंभिक किंमत 8.99 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एमपीव्ही आणि एसयूव्हीचा कॉम्बिनेशन असलेल्या या कारला RV देखील म्हटले जाते. कंपनीने प्रीमिअर, प्रेस्टिज, प्रेस्टिज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस अशा पाच प्रकारात ही कार लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना या कारमध्ये तीन इंजिन पर्याय दिले आहेत.
इंजिन पर्याय आणि मायलेज
नवीन किया कॅरेन्समध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यात पहिल्या पर्यायात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे सहा-स्पीड मॅन्युअलसह येते. तर दुसऱ्या पर्यायात 1.4 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 140 एपी आणि 242 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल आणि पेडल शिफ्ट 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. तसेच याच्या तिसऱ्या इंजिन पर्यायात 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 115 एचपी आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारबद्दल माहिती देताना कंपनीने दावा केला आहे की, ही कार 21.3 kmpl मायलेज देते.
फीचर्स
कंपनीने या नवीन किया कॅरेन्समध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. ज्यात टॉप-एंड व्हेरियंटमध्ये व्हेंटीलेटस सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन, रियर व्ह्यू कॅमेरा, टच क्लायमेट कंट्रोल, एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच दुसऱ्या रांगेसाठी इलेक्ट्रिक वन टच टंबल डाउन, ए. स्टँडर्ड सनरूफ, कूल्ड कप होल्डर, रिट्रॅक्टेबल सनशेड, रिट्रॅक्टेबल टेबल, 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड आणि दमदार बोस ऑडिओ सिस्टीम सारखे फीचर्स दिले आहेत. ग्राहक ही कार 7 सीटर आणि 6 सीटर अशा दोन पर्यायात खरेदी करू शकतात.
व्हेरिएंट आणि किंमत
कियाने कॅरेन्सची प्रारंभिक किंमत 8.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. तसेच याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16.99 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. भारतात याकारची स्पर्धा Maruti XL6, Hyundai Alcazar आणि Toyota Innova शी होणार आहे. एमव्हीपी प्रकारात ही किफायतशीर गाडी आहे.
हेही वाचा :
- Honda CBR150R : Yamahaला टक्कर देईल Honda ची नवीन CBR150R बाईक, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स, किंमत आणि बरंच काही...
- Maruti Suzuki Electric Vehicle: मारुती घेऊन येत आहे देशातील सर्वात स्वस्त 'इलेक्ट्रिक कार', एका चार्जमध्ये गाठणार 500 किमीचा पल्ला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha