एक्स्प्लोर

UPSC निकालात पुण्याच्या आर्चित डोंगरेने झेंडा फडकवला, महाराष्ट्रात पहिला, देशात तिसरा!

UPSC Results 2025 UPSC results अर्चित हा पुण्यातला (Pune) रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित हा पुण्यातला (Pune) रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. 

युपीएससी आयोगाकडून 2024 च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण 1009 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये, 335 सर्वसाधारण, 109 ईडब्लूएस, 318 ओबीसी, 160 एससी, 87 एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. 
विशेष म्हणजे 17 एप्रिल 2025 पर्यंत या युपीएससी परीक्षांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर, 7 जानेवारी 2025 पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. युपीएसीकडून 2024 च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण 1132 पदांसाठी भरती काढली होती. 

दरम्यान, युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असून महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, मुलींनी देखील यंदाच्या परीक्षेत आपली सरशी दाखवून दिलीय. 

आयटी कंपनीतील नोकरी सोडून UPSC ची तयारी

अर्चित डोंगरेहा मूळचा पुण्याचा असून त्याने शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. तर, महाविद्यालयीन शिक्षणसाठी पुणे गाठलं होतं. इंजिनिअरींगच्या पदवीनंतर 1 वर्षे आयटी कंपनीत काम केल्यानंतर त्याने युपीएससी परीक्षेसाठी आपली नोकरी सोडली. विशेष म्हणजे मागीलवेळी 2023 च्या निकालात युपीएससीमध्ये त्याने 153 वी रँक मिळवली होती. त्यानंतर, आयपीएसची निवड करुन तो सध्या आयपीएस प्रशिक्षणासाठी असल्याची माहिती आहे. त्याने, यावर्षी पुन्हा परिक्षा दिल्यानंतर तो आता देशात तिसरा आलाय. त्यामुळे, अर्चितने देशात महाराष्ट्राची पताका फडकवली आहे. 

हेही वाचा

भाचीला न्याय द्या, पीडित आईच्या व्हायरल पत्रानंतर एकनाथ शिंदेंचा फोन, निलम गोऱ्हेंनीही घेतली कुटुंबीयांची भेट

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anant Garje and Gauri Garje Case: गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anant Garje and Gauri Garje Case: गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
गौरीचा मृत्यू झाल्याचं समजताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं; शरीरावर एकूण 28 जखमा, पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Maharashtra Live Updates: वसईत हार्पिक–डेटॉलसह नामांकित कंपन्यांचा बनावट माल मोठ्याप्रमाणावर जप्त
Nanded Crime Love Story: बर्थडेला काटेरी गुलाबाचं झाड दिलं, आचलच्या भावांनी सक्षमला मनातील गोष्टींचा थांगपत्ताही लागून दिला नाही अन् वेळ येताच काटा काढला
बर्थडेला काटेरी गुलाबाचं झाड दिलं, आचलच्या भावांनी सक्षमला मनातील गोष्टींचा थांगपत्ताही लागून दिला नाही अन् वेळ येताच काटा काढला
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Embed widget