मराठमोळ्या अधिकाऱ्याची कमाल! परीक्षेसाठी IPS महेश भागवत आणि टीमचं मार्गदर्शन; 100 जण UPSC पास
UPSC Result 2022 : नुकताच यूपीएससीचा निकाल लागला. यात शेकडो उमेदवारांनी घवघवीत यश मिळवलं. IPS महेश भागवत यांनी मार्गदर्शन केलेल्या 100 जणांनी UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे.
हैदराबाद : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश एम भागवत आणि त्यांच्या टीमनं मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या टीमकडून मार्गदर्शन घेतलेले एक, दोन नव्हे तब्बल 100 विद्यार्थी नुकत्याच आलेल्या निकालात UPSC पास झाले आहेत. महेश भागवत हे सध्या हैदराबादमधील रचकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. महेश भागवत आणि त्यांच्या टीमने मुलाखतीसाठी मार्गदर्शन केलेल्या एकूण 100 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
उत्तीर्ण झालेल्या टॉप 100 रँकर्समध्ये महाराष्ट्रातील 13 व्या क्रमांकावर असलेल्या प्रियंवदा म्हाडदळकरसह 16 उमेदवारांना रचकोंडा पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी प्रशिक्षण दिले होते. त्याचप्रमाणे, 101 ते 685 मधील रँक असलेल्या 83 हून अधिक उमेदवारांना भागवत आणि त्यांच्या टीमने मुलाखतीसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय, पंजाब, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांनी 2022 च्या या निकालात यश मिळवलं आहे.
दरवर्षी मुख्य परीक्षेनंतर महेश भागवत हे त्यांच्या मार्गदर्शकांच्या टीमसह IAS, IPS आणि IRS अधिकारी आणि विषय तज्ञ व्यक्तिमत्व चाचणीसाठी विनामूल्य प्रशिक्षण देतात. हे प्रशिक्षण विशेषत: नागरी सेवा इच्छूकांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिले जाते.
केवळ दोन तेलुगू भाषिक राज्यांतीलच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, आसाम, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारही त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये असतात. भागवत आणि त्यांच्या टीमने गेल्या आठ वर्षांत त्याने अनेकांना मदत केली आहे.
दरम्यान या सर्व यशस्वी उमेदवारांचे भागवत यांनीअभिनंदन केले आहे. भागवत यांच्यासह या मार्गदर्शक टीममध्ये डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नितीश पाथोडे, आनंद पाटील, सुप्रिया देवस्थळी, नीळकंठ आव्हाड, समीर उन्हाळे, राजीव रानडे, विवेक कुलकर्णी, अभिषेक सराफ, मुकुल पाटील, सतविन कुलकर्णी, सतीश पाटील, डॉ. इंगवले, अनुदीप दुरीशेट्टी, साधू नरसिंहा रेड्डी, पी श्रीजा, नीलकंठ आव्हाड आदींचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
UPSC Topper Profile : इतिहासात बीए, जामिया मिलियामधून कोचिंग, कसा होता UPSC टॉपर श्रुती शर्माचा प्रवास?
UPSC Result : यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI