UPSC Topper Profile : इतिहासात बीए, जामिया मिलियामधून कोचिंग, कसा होता UPSC टॉपर श्रुती शर्माचा प्रवास?
UPSC 2021 परीक्षेच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. श्रुती शर्माने अव्वल क्रमांक पटकावला. जाणून घेऊया श्रुती शर्माच्या प्रवासबद्दल
![UPSC Topper Profile : इतिहासात बीए, जामिया मिलियामधून कोचिंग, कसा होता UPSC टॉपर श्रुती शर्माचा प्रवास? UPSC 2021 Result BA in History, Coaching from Jamia Millia, How was the journey of UPSC topper Shruti Sharma? UPSC Topper Profile : इतिहासात बीए, जामिया मिलियामधून कोचिंग, कसा होता UPSC टॉपर श्रुती शर्माचा प्रवास?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/30/22948f484a15761be241a92992ddd949_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UPSC Civil Service Final Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. या परीक्षेत श्रुती शर्माने (Shruti Sharma) अव्वल स्थान पटकावलं आहे. श्रुती शर्मा ही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आरसीएची विद्यार्थिनी आहे. यंदा जामियाच्या आरसीएमधून एकूल 23 उमेदवारांनी यश मिळवलं.
कोण आहे श्रुती शर्मा?
श्रुती शर्माने केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवला आहे.
श्रुती शर्मा ही उत्तर प्रदेशच्या बिजनोरची रहिवासी आहे.
तिने दिल्लीमधील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तिचा विषय इतिहास होता.
तर दिल्लीच्याच जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून (JNU) आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं
ती शर्मा दोन वर्षांपासून जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादामधून केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत होती.
निकाल आल्यानंतर श्रुतीच्या घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे.
UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली होती आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखत ही परीक्षेची शेवटची फेरी होती, जी 5 एप्रिल रोजी सुरु झाली आणि 26 मे रोजी संपली होती. आज या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
यूपीएससी निकालाचं वैशिष्ट्य
2021 च्या यूपीएससी निकालाचं हे मोठं वैशिष्ट्य यंदा पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर अंकिता अग्रवालने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे.
महाराष्ट्रातील 40 उमेदवार उत्तीर्ण
यावर्षी 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील 40 हून अधिक उमेदवारांना यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. या निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं 97 वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने 248 वा क्रमांक पटकावला आहे. तर रोशन देशमुखने 451 वा आणि अश्विन गोळपकरने 626 वा क्रमांक पटकावला आहे.
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले 10 विद्यार्थी
पहिला क्रमांक : श्रुती शर्मा
दुसरा क्रमांक : अंकिता अग्रवाल
तिसरं क्रमांक : गामिनी सिंगला
चौथा क्रमांक : ऐश्वर्य वर्मा
पाचवा क्रमांक : उत्कर्ष द्विवेदी
सहावा क्रमांक : यक्ष चौधरी
सातवा क्रमांक :सम्यक एस जैन
आठवा क्रमांक : इशिता राठी
नववा क्रमांक : प्रीतम कुमार
दहावा क्रमांक : हरकीरत सिंह रंधावा
अधिकृत वेबसाईटवर निकाल
केंद्रीय लोकसेवा आयो (UPSC) नागरी सेवा 2021 चा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज निकाल जाहीर झाला आहे. यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
आत्तापर्यंत UPSC ने निकाल जाहीर करण्याची कोणत्याही तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नव्हती. मात्र मागील वर्षाच्या निकालाचा विचार करता 30 मे 2022 रोजी अंतिम निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) साधारणपणे शेवटच्या मुलाखतीच्या तारखेनंतर दोन दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची पद्धत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)