एक्स्प्लोर
UPSC 2021 Calendar: यूपीएससीच्या परीक्षांचं वर्षभराचं कॅलेंडर जारी
UPSC 2021 Calendar Released: यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बदल यामध्ये करण्यात आले आहेत, तर काही नवीन गोष्टीही करण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती यूपीएससीच्या वेबसाईटवर मिळणार आहे.
नवी दिल्ली : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात यूपीएससीचं 2021 चं वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व परीक्षांचं शेड्युल यूपीएससीच्या upsc.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बदल यामध्ये करण्यात आले आहेत, तर काही नवीन गोष्टीही करण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती यूपीएससीच्या वेबसाईटवर मिळणार आहे.
यूपीएससीमधील सर्वात महत्त्वाची सिव्हिल सर्विस परीक्षा 27 जून 2021 ला निश्चित करण्यात आली आहे. साधारणत: ही परीक्षा मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला होत असते. यावर्षीची पूर्व परीक्षाही मे महिन्यात होणार होती ती लांबणीवर पडली असून ती आता 4 ऑक्टोबरला होणार आहे.
परीक्षेचं नाव | नोटिफिकेशनची तारीख | अर्ज करण्याची अंतिम मुदत | परीक्षेची तारीख |
कंबाइंड जियो-साइंटिस्ट प्री परीक्षा 2021 | 07.10.2020 | 27.10.2020 | 21.02.2021 |
सीडीएस परीक्षा (I) 2021 | 28.10.2020 | 17.11.2020 | 07.02.2021 |
एनडीए आणि एनए परीक्षा (I) 2021 | 30.12.2020 | 19.01.2021 | 18.04.2021 |
सिव्हिल सर्विसेस प्री परीक्षा 2021, इंडियन फॉरेस्ट सर्विस प्री परीक्षा 2021 | 10.02.2021 | 02.03.2021 | 27.06.2021 |
इंजीनियरिंग सर्विसेस प्री परीक्षा 2021 | 07.04.2021 | 27.04.2021 | 18.07.2021 |
सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस एग्जाम 2021 | 15.04.2021 | 05.05.2021 | 08.08.2021 |
कंबाइंड मेडिकल सर्विसेस एग्जाम 2021 | 05.05.2021 | 25.05.2021 | 29.08.2021 |
एनडीए आणि एनए परीक्षा (II) 2021 | 09.06.2021 | 29.06.2021 | 05.09.2021 |
सिव्हिल सर्विसेस मुख्य परीक्षा 2021 | 17.09.2021 | ||
सीडीएस परीक्षा (II) 2021 | 04.08.2021 | 24.08.2021 | 14.11.2021 |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement