अमेरिकन कंपनीवर उत्तर प्रदेशातील महिलेने दाखल केला एक कोटी रुपयांचा दावा
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील एका महिलेने अमेरिकन पिझ्झा कंपनीवर एक कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. या कंपनीने आपल्याला व्हेजच्या ठिकाणी नॉन-व्हेज पिझ्झा दिल्याने धार्मिक भावना दुखावल्याचं त्या महिलेने सांगितलं आहे.
लखनऊ : एका अमेरिकन कंपनीने आपल्याला व्हेज पिझ्झाच्या ठिकाणी नॉन व्हेज पिझ्झाची डिलिव्हरी दिली आणि त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशातील एका महिलेने अमेरिकन कंपनीविरोधात एक कोटीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे दिलेल्या ऑर्डरची डिलिव्हरी न करता भलत्याच पिझ्झाची डिलिव्हरी करणे कंपनीला महागात पडणार असल्याचं दिसतंय.
ही घटना सुमारे दोन वर्षापूर्वीची आहे. 2019 साली उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या एका महिलेने एका अमेरिकन कंपनीला व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता. त्या पिझ्झामध्ये मशरुमच्या ठिकाणी मांसाचा तुकडा मिळाल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. या तक्रारीची दखल घेत पिझ्झा कंपनीने त्या महिलेच्या संपूर्ण कुटुंबाला पिझ्झा देण्याची ऑफर दिली होती. परंतु या तडजोडीला ती महिला तयार झाली नाही. त्यानंतर हे प्रकरण कन्झ्युमर फोरममध्ये गेलं.
पुण्यात शिजणार तब्बल सात हजार किलो पुणेरी मिसळ...30 हजार गरजूंना होणार वाटप
या महिलेने सांगितलं आहे की, कंपनीने तो पिझ्झा अर्धा तास उशीरा दिला पण यावर तिची कोणतीही तक्रार नव्हती. कंपनीने ग्राहकांच्या ऑर्डरवर ध्यान देणं आवश्यक आहे. प्रत्येकजण नॉन व्हेज खातो असं काही नव्हतं. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणूनच या प्रकरणात कन्झ्युमर फोरममध्ये कंपनीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
येत्या 17 मार्चला होणार सुनावणी
दीपाली त्यागी असं दावा दाखल करणाऱ्या महिलेचं नाव असून तिने आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं सांगितंल आहे. त्यामुळे आपण कंपनीला माफ करु शकत नसल्याचं तिने सांगितलं आहे. कंपनीकडे यावर तक्रार केल्यानंतर आपल्याला हवा तसा प्रतिसाद आला नसल्याचंही तिने सांगितलं आहे. त्यामुळेच पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीच्या एका जिल्हा कन्झ्युमर फोरममध्ये या कंपनीच्या विरोधात एक कोटीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर येत्या 17 मार्चला सुनावणी करण्यात येणार आहे.
डॉमिनोज देणार एका ऑस्ट्रेलियन दाम्पत्याला तब्बल 60 वर्ष "फ्री पिझ्झा"