एक्स्प्लोर

UP Encounter Data: उत्तरप्रदेशात योगी सरकारच्या काळात 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर, दर 15 दिवसाला एक गुंड पोलीस चकमकीत ठार

UP Encounter Data: उत्तरप्रदेशात एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या एकूण 186 गुन्हेगारांपैकी 96 गुन्हेगारांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत

UP Encounter Data: उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) योगी सरकारच्या काळात 2017 पासून आत्तापर्यंत 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर म्हणजे दर 15 दिवसाला एक गुंड पोलीस चकमकीत ठार होत असल्याची माहिती समोर आली आहे.  तर पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या गुन्हेगारांची संख्या 5046 इतकी आहे.

2017 पासून 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर 

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी एक अहवाल जारी केला असून, त्यात ही सर्व आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, मार्च 2017 पासून, योगी आदित्यनाथ यांनी पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत उत्तरप्रदेशमध्ये 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आले आहेत. म्हणजेच  दर 15 दिवसाला एक गुंड पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. तर पायात किंवा शरीराच्या इतर भागात गोळी लागल्याने जखमी झालेल्या गुन्हेगारांची संख्या 5,046 आहे. म्हणजेच दर 15 दिवसांनी 30 हून अधिक कथित गुन्हेगार गोळी लागल्याने जखमी होतात.

एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, उत्तरप्रदेशमध्ये  गुंड आणि पोलीस यांच्या चकमकीत ठार झालेल्या एकूण 186 गुन्हेगारांपैकी 96 गुन्हेगारांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच काही गुन्हेगारांवर विनयभंग, गँगरेप आणि पॉक्सोसारखे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 2016 ते 2022 या कालावधीत राज्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने घसरला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, घरफोडीच्या घटनांमध्ये 87 आणि खुनाच्या घटनांमध्ये 37% घट झाली आहे. 

गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमदची  खुलेआम हत्या 

 काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमदची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. ही सर्व घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडली. यानंतर तिन्ही आरोपींना स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एखाद्या चित्रपटात शोभेल असं हत्येचं आणि त्यानंतरच्या गोळीबाराचं भयानक दृष्य कॅमेराबंद झालं आहे. अतिक आणि अशरफ यांना जेरबंद करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी जंगजंग पछाडलं होतं. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा असद एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता.

हे ही वाचा :

Atiq Ahmed Killed: उत्तर प्रदेशात 12 सेकंदांत दोन हत्या; एक अतिक, अशरफची अन् दुसरी... : कपिल सिब्बल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM 13 November 2024Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Embed widget