Yogi Adityanath Helicopter : वाराणसीत CM योगी थोडक्यात वाचले, हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, काय घडले?
Yogi Adityanath Helicopter : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
Yogi Adityanath Helicopter : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनऊला जात होते, त्यानंतर हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. काय घडले नेमके?
हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग
योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनऊला जात होते, त्यानंतर हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. याचे कारण म्हणजे सीएम योगींच्या हेलिकॉप्टरवर अचानक पक्षी आदळला, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती असे सांगण्यात येत आहे. मात्र या पक्ष्याच्या धडकेनंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यादरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित आहेत.
घटनेनंतर चौकशी
या घटनेनंतर चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर सीएम योगींना पर्याय म्हणून दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनऊला जात होते, मात्र उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच पक्षी हेलिकॉप्टरला धडकले, त्यानंतर त्यांना उतरावे लागले.
प्रोटोकॉल अंतर्गत लँडिंग
जेव्हाही अशी घटना घडते, तेव्हा हेलिकॉप्टर प्रोटोकॉल अंतर्गत उतरवले जाते. त्यानंतर तांत्रिक पथक त्याची कसून तपासणी करते आणि जोपर्यंत सर्व काही ठीक आहे याची खात्री होत नाही, तोपर्यंत व्हीआयपी हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी दिली जात नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Yogi Adityanath यांच्याशी Uddhav Thackeray पत्रव्यवहार करणार : Aaditya ठाकरे
Bulldozer Action in UP: 'योगी सरकारने बुलडोझर कारवाई थांबवावी', जमियत उलेमा-ए-हिंदने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका
Marathi In Uttar Pradesh : महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी युपीत मराठी शिकवा; कृपाशंकर सिंह यांचे CM योगींना पत्र
Samrat Prithviraj : उत्तर प्रदेशमध्ये 'सम्राट पृथ्वीराज' करमुक्त होणार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय
'फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या'; संजय राऊतांचा 'रोखठोक' हल्लाबोल