CM Yogi Death Threat : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, फेसबुकवर पोस्ट शेअर
CM Yogi Death Threat : या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, CM योगींचे शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
CM Yogi Death Threat : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावेळी फेसबुकवर (Facebook) मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
पोलीस विभागात खळबळ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तसेच ज्या फेसबुक प्रोफाईलवरून सीएम योगी यांना धमकावण्यात आले आहे, त्यांचे नाव आत्मा प्रकाश असून यांनी स्वत: पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभागही सक्रिय झाला आहे.
अकाऊंट हॅक करून फेसबुक पेज तयार
पोलिसांच्या माहितीनुसार, आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. याच पानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय शिरच्छेद करणाऱ्याला 2 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले आहे.
फेसबुक प्रोफाइलवर पाकिस्तानी झेंडा
मुरादाबाद शहराचे पोलीस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, ज्या फेसबुक पेजवरून धमकी देण्यात आली आहे, त्याच्या प्रोफाइल पिक्चरवर पाकिस्तानचा झेंडा आहे. या संदर्भात फेसबुकला ईमेल पाठवून या पेजबाबत माहिती मागवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी एका पिशवीत धमकी पत्र सापडले होते.
काही दिवसांपूर्वी देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. एका पिशवीत धमकी पत्र सापडले होते. ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासोबतच देवेंद्र तिवारी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. देवेंद्र यांच्या घरातूनच हे धमकीचे पत्र मिळाले आहे. देवेंद्र यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. धमकीची पत्रे मिळाल्याप्रकरणी लखनऊच्या आलमबाग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. तर लखनऊ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या
Yogi Adityanath Helicopter : वाराणसीत CM योगी थोडक्यात वाचले, हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, काय घडले?
Marathi In Uttar Pradesh : महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी युपीत मराठी शिकवा; कृपाशंकर सिंह यांचे CM योगींना पत्र