एक्स्प्लोर
स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखाच रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभा राहणार?
सरदार पटेलांच्या गुजरातमधील भव्य पुतळ्यानंतर देशात अजून एक भव्य पुतळा उभा राहण्याची शक्यता आहे.
लखनऊ : सरदार पटेलांच्या गुजरातमधील भव्य पुतळ्यानंतर देशात अजून एक भव्य पुतळा उभा राहण्याची शक्यता आहे. अयोध्येत श्रीरामाचा 151 मीटर उंचीचा पुतळा उभा रहाण्याची चर्चा रंगू लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासंदर्भात आज घोषणा करु शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा पुतळा निर्माण करणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनाच रामाच्या पुतळ्याचे काम देण्यात आले येईल अशीही माहिती समोर आली.
एवढंच नाही तर रामाच्या पुतळ्याची छोटी प्रतिकृती योगी आदित्यनाथ यांना राम सुतार यांनी दाखवली असून ती त्यांना पसंत पडल्याचंही प्राथमिक माहिती आहे. दिवाळीच्या तोंडावरच ही योजना योगी आदित्यनाथ यांनी आणली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement