एक्स्प्लोर

पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो

नवी दिल्ली : यंदा पद्म पुरस्कारांच्या यादीत भारतीयांसाठी रिअल हिरो असणारी अनेक नावं झळकली आहेत. यामध्ये कर्नाटकचे ब्रिजमॅन गिरीश भारद्वाज, कलारिपयट्टूत प्राविण्य मिळवणाऱ्या एकमेव महिला असलेल्या केरळच्या मीनाक्षी अम्मा, महिलांवर मोफत उपचार करणाऱ्या डॉ. भक्ती यादव, आसामी लोकगीतांचे गायक जितेंद्र हरिपाल यांचा समावेश आहे. मीनाक्षी अम्मा कलारिपयट्टू ही साहसी कला शिकवणाऱ्या मीनाक्षी अम्मा या एकमेव महिला आहेत. 76 वर्षांच्या मीनाक्षी अम्मा तलवारबाजी, लाठीकाठी आणि उंचीझिल शिकवतात. वयाच्या सातव्या वर्षापासून मीनाक्षी अम्मा यांनी वडिलांकडून हा साहसी खेळ शिकायला सुरुवात केली. गेल्या 68 वर्षांपासून मीनाक्षी अम्मा यांनी कलारिपटट्टूच्या प्रचार आणि प्रसाराचा वसाच घेतला आहे. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो जितेंद्र हरपाल मूळचे उदिशाचे असलेल्या जितेंद्र हरपाल यांना रंगबाती या गाण्यानं नावलौकिक मिळवून दिला. दलित कुटुंबात जन्म झालेल्या हरपाल यांनी गाण्याचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही. पण तरीही त्यांच्या सुरांना ओडिशासह संपूर्ण देशानं आपलं मानलं. जितेंद्र हरपाल यांना उदिशात मोठा फॅन फॉलोइंग आहे. पद्म पुरस्कारांनाही जितेंद्र हरपाल यांनी आपल्या गायकीची दखल घ्यायला भाग पाडलं. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो डॉ. भक्ती यादव इंदोर मधील पहिली महिला डॉक्टर ही डॉ. भक्ती यादव यांची प्रमुख ओळख. सरकारी नोकरी सोडून मोफत उपचार देण्याचा ध्यास डॉ. भक्ती यादव यांनी घेतला. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो महिलांची प्रसुती त्यांनी केली. 91 वर्षाच्या डॉ. भक्ती आजही त्याच ऊर्जेने आणि जोमाने रुग्णांची मोफत सेवा करतात. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो गिरीष भारद्वाज ब्रिज मॅन ओळख असलेले गिरीष भारद्वाज पेशाने इंजिनिअर आहेत. नोकरी न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा ब्रिज बांधण्याकडे वळवला. लोकसहभागातून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील अतिशय दुर्गम ठिकाणी 100 हून अधिक पूल गिरीष भारद्वाज यांनी उभारले. त्यांनी बांधलेल्या सस्पेन्शन पूलनं अनेकांना विकासाचा मार्ग दाखवला. ब्रिज मॅन असलेले गिरीष भारद्वाज देशाचे रिअल हिरो मानले जातात. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो दरिपल्ली रामय्या तेलंगणातील 68 वर्षीय दरिपल्ली रामय्या या अवलियानं कोट्यवधी झाडं लावली आहेत. दरिपल्ली आणि त्यांची अर्धांगिनी जनम्मा खिशात बिया घेऊन हिंडतात, आणि मोकळी जागा दिसली की तिकडे बिजं रोवतात. भूतलावर हरितक्रांती करण्याचा वसाच जणू या दाम्पत्याने घेतला आहे. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो करिमल हक बंगालमध्ये चहाच्या मळ्यातला एक साधा कामगार. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या आईला प्राण गमवावे लागले आणि याच घटनेनंतर करिमल यांनी आपल्या बाईकचं रुपांतर मोफत रुग्णवाहिकेत केलं. धालाबारीमधल्या 20 गावांसाठी त्यांची बाईक म्हणजे जीवनवाहिनी आहे. त्यांच्या बाईक अॅम्ब्युलन्समुळे आजवर 3 हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो शेखर नाईक 2012 मधील दृष्टीहीन क्रिकेटपटूंच्या टी 20 विश्वचषकाचे कर्णधार शेखर नाईक. त्यांच्या नेतृत्वात अंध क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. पाठोपाठ 2014 मधील दृष्टीहीन क्रीडापटूंचा वनडे विश्वचषकही नाईक यांच्या संघाने पटकावला. आजच्या काळातील दृष्टीहीन क्रिकेटमधील ते सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत. 13 वर्षांत त्यांनी 32 शतकं ठोकली आहेत. पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरलेले देशातील रिअल हिरो

संबंधित बातम्या :

शरद पवार यांना पद्मविभूषण, कोहली, साक्षी, दीपा मलिकला पद्मश्री

महाराष्ट्रातून 'पद्मभूषण'चे मानकरी तेहम्तन उद्वाडिया यांचा परिचय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget