एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Union Cabinet Meeting Today : आज मोदींच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Union Cabinet Meeting Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 19 नोव्हेंबर रोजी देशवासियांना संबोधित करताना तिनही कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याची घोषणा केली होती. आता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं कायदे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरु केली आहे. आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तिनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी एक विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. 

विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित करण्यात येणार आहे. त्यानंतरच मोदी सरकारनं लागू केलेले तिनही कृषी कायदे घटनात्मक प्रक्रियेनुसार, रद्द होतील. मोदी कॅबिनेट आज या तिनही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करु शकतात. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पीएमओ कार्यालयात आज सकाळी 11 वाजता सुरु होईल. 

विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर केलं जाईल 

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तिनही कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्यानंतर 29 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच कृषी कायदे मागे घेण्याची घटनात्मक प्रक्रिया सुरु होईल. ज्याप्रमाणे एखादा नवा कायदा तयार करुन संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडून तो मंजूर करुन घेतला जातो, त्याचप्रमाणे एखादा लागू करण्यात आलेला कायदा मागे घेतला जातो, तो रद्द केला जातो. 

दुसऱ्या शब्दांत, जुना कायदा नवा कायदा करुनच रद्द केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी तीन कायद्यांसाठी तीन स्वतंत्र विधेयकं किंवा तिन्हींसाठी एक विधेयक 29 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभा किंवा राज्यसभेत मांडलं जाईल. हे विधेयक मांडण्यात आल्यानंतर, एका सभागृहानं आणि नंतर दुसऱ्या सभागृहानं चर्चा किंवा चर्चा न करता मंजूर केल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल.

राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच तिन्ही कृषी कायदे रद्द केले जातील. विधेयक मंजूर होण्यासाठी किती वेळ लागेल, हे सरकारच्या प्राधान्यांवर अवलंबून असेल. तथापि, पंतप्रधानांच्या घोषणेवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की, दोन दिवसांत हे विधेयक दोन्ही सभागृहांतून मंजूर करून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. अशा परिस्थितीत पहिल्या आठवड्यातच तीनही कृषीविषयक कायदे मागे घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या गोष्टी : 

1. तिनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारकडून एकच विधेयक मांडण्याची शक्यता 
2. विधेयकाचं नाव असेल, Farm Laws Repeal Bill , 2021
3. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता 
4. आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता 
5. सरकार या अधिवेशनात 25 नवी विधेयकं सादर करणार  
6. सरकारने लोकसभेत सादर करण्यासाठी जी नवीन विधेयकं सूचीबद्ध केली आहेत. त्यात क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याच्या विधेयकाचा समावेश आहे.
7. विधेयकाचा उद्देश असा आहे :  To  create a facilitative framework for creation of the official digital currency to be issued by RBI.
8. या विधेयकात सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची तरतूद आहे.
9. काही अपवाद ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

दरम्यान, मी तिनही कृषी कायदे मागे घेतोय... असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिनही कृषी कायदे मागे घेतले. गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं मोदींनी ही मोठी घोषणा केली. मोठी घोषणा करताना मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 December 2024Beed Santosh Deshmukh News Update : संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर किती जखमा? पोस्टमार्टममध्ये काय?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 December 2024Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
Sharad Pawar : निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Embed widget