Umrah : शाहरुखने सौदी अरेबियात केलेला 'उमराह' विधी नक्की काय आहे? जाणून घ्या...
Umrah : मुस्लिम धर्मात 'उमराह'ला विशेष महत्त्व आहे. सौदी अरेबियामध्ये हा विधी केला जातो.
Umrah : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) नुकतीच सौदी अरेबियातील (Saudi Arabia) मक्का मशिदीला भेट दिली. मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह (Umrah) करताना दिसतो आहे. मुस्लीम धर्मात 'उमराह'ला विशेष महत्त्व आहे. उमराह म्हणजे काय हे जाणून घेऊया...
सौदी अरेबियात होणाऱ्या एका तीर्थयात्रेला 'उमराह' असे म्हटले जाते. हा एक प्रकारचा धार्मिक विधी आहे. उमराह करण्यासाठी विशिष्ट वेळ किंवा दिवस नसतो. हा विधी केव्हाही केला तरी चालतो. पण हजला गेल्यावर यात्रेकरु सामान्यपणे हा विधी करुन घेतात.
हज आणि उमराहमध्ये काय फरक आहे?
हज यात्रा एका विशेष महिन्यात केली जाते. तर उमराह ही एक छोटी धार्मिक प्रक्रिया आहे. पण उमराह वर्षातून कधीही करता येते. याची सक्ती नाही. जे यात्रेकरु हजला जातात ते उमराह देखील करतात. मक्केला कधीही भेट देऊन उमराह करता येतो.
उमराहमध्ये यात्रेकरुंना क्षमा मागण्याची संधी मिळते. उमराह करणाऱ्याला पापांपासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते. सौदी अरेबियाबाहेरील नागरिकांना देखील उमराह करण्याची संधी मिळते. त्यांच्यासाठी खास व्हिजाची सोय केली जाते. हा व्हिजा एका महिन्यासाठी वैध असतो. दुसरीकडे सौदी अरेबियातील नागरिक कोणत्याही कागदपत्रांशिवाय उमराह करु शकतात.
जगातील कोणतीही मुस्लीम व्यक्ती कधीही उमराह करु शकते. या विधीसाठी दोन तासांचा कालावधी लागतो. उमराह करण्यासाठी खास पोशाख करण्यात येतो. उमराहदरम्यान यात्रेकरु कोणत्याही पद्धतीचं हिंसक वर्तणूक करु शकत नाहीत. उमराह करण्यासाठी यात्रेकरु मक्कामध्ये आठ दिवस आणि मदिनामध्ये सात दिवस घालवतात आणि धार्मिक कार्य करतात.
View this post on Instagram
संबंधित बातम्या