एक्स्प्लोर

आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, उमा भारतींची घोषणा

“कंबरदुखी आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे चालण्या-फिरण्यास त्रास होत आहे. याच कारणास्तव मी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही. झांसीच्या जनतेने जे प्रेम आणि स्नेह दिला, त्याबद्दल मी सदैव त्यांची सदैव ऋणी राहिन.” असं उमा भारती यांनी यावेळी सांगितलं.

झांसी/ मध्य प्रदेश : केंद्रीय मंत्री उमा भारतींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसह कोणतीही निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे निवडणुकीची धावपळ सहन होत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. माध्यमांशी बोलताना उमा भारती म्हणाल्या की, “कंबरदुखी आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे चालण्या-फिरण्यास त्रास होत आहे. याच कारणास्तव मी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही. झांसीच्या जनतेने जे प्रेम आणि स्नेह दिला, त्याबद्दल मी सदैव त्यांची सदैव ऋणी राहिन.” त्या पुढे म्हणाल्या की, “लोकसभेत भाजपचे दोन खासदार होते, तेव्हापासून आत्तापर्यंत पक्षासाठी काम केलं, आणि पुढेही करत राहिन. पण आता शरीर साथ देत नाही आहे. मात्र, सध्या भाजप हा देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झाल्याचा आनंद आहे.” विशेष म्हणजे, त्यांनी यावेळी बोलताना आपण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच विजय होईल, आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उमा भारती यांनी झांसी मतदारसंघातून 2014 च्या लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. उमा भारतींचा अल्प परिचय उमा भारतींचा जन्म 3 मे 1959 रोजी मध्य प्रदेशमधील टीकमगढ जिल्ह्यात झाला. साध्वी ऋतम्भरा यांच्यासोबत राम मंदिर आंदोलात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांच्यांकडे मनुष्यबळ विकास, पर्यटन आणि क्रीडा मंत्रालयासारखी महत्त्वाची खाती होती. 2003 ची विधानसभा निवडणूक मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक उमा भारतींच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवत, त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण ऑगस्ट 2004 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे गंगा स्वच्छता मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण काही काळानंतर त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं. सध्या त्यांच्याकडे केवळ स्वच्छता आणि पेयजल खातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget