UGC NET July 2020 Results Announced : यूजीसी नेट 2020 चा निकाल जाहीर; nta.ac.in वर निकाल पाहा
UGC NET Results Announced : यूजीसी नेट निकाल 2020 जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पाच लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
UGC NET July 2020 Results Announced: यूजीसी नेट निकाल 2020 जाहीर झाला आहे. या परीक्षेत पाच लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. निकाल एनटीए वेबसाइट nta.ac.in वर उपलब्ध आहे. एनटीएने 24 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत यूजीसी नेट जून 2020 ची परीक्षा घेतली होती. परीक्षेसाठी नोंदणीकृत 8,60,976 उमेदवारांपैकी केवळ 5,26,707 परीक्षार्थीच उपस्थित राहिले.
यावेळी नेट परीक्षा (सीबीटी) संगणक पद्धतीने घेण्यात आली आहे. यात 12 दिवसांमध्ये 81 परीक्षा घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. यावेळी एनटीएने ही परीक्षा संगणक आधारित ठेवली होती. सर्व प्रमुख विषयांसाठी अंतिम कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. आपण अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर जाऊन आपली कटऑफ देखील तपासू शकता.
यूजीसी नेट म्हणजे काय?
यूजीसी नेट ही राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. मात्र, याची दोन उद्दीष्टे आहेत. पहिलं म्हणजे विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेण्यास मदत होते. दुसरं विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी त्याची पात्रता आवश्यक आहे. नेट शिवाय प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. विशेष म्हणजे एनटीए या परीक्षेचं आयोजन करते. यापूर्वी ही परीक्षा यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) घेत होते.
इतर महत्वाच्या बातम्या :
MHT CET Results Declared: 41 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 पर्सेंटाईल गुण, निकाल इथे पाहा
MHT-CET Result 2020 | एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल जाहीर