एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जंतर मंतरवर सीजेपीच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकार बदलल्याशिवाय आयुष्य बदलणार नसल्याचं म्हटलं.

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाषण करण्यासाठी नव्हे तर युवा शक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे.  स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाहतोय एक सरकार जे आपल्या भविष्यावर लाठीचार्ज करतंय. तुम्ही फक्त तरुण नाही तर या देशाचे भविष्य आहात. तुम्हाला पहिल्यांदा कॉकरोच म्हणणाऱ्या त्या महानुभावांचे आभार मानतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की स्वातंत्र्यलढ्यापर्वी तुमच्या वयाच्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं नसतं तर स्वातंत्र्य पाहायला मिळालं नसतं. काही लोक अशे होते ज्यांना इंग्रज होते त्यांना आतंकवादी मानायचे. मला असं वाटतं जे तुम्हाला आतंकवादी म्हणतात ते विदेशातून आलेत की काय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  तुम्हाला काल त्यांनी अमानुषपणे मारले.  काही गुंड तुमच्यावर लाठी हल्ला करत होते. एका गुंडाचा फोटो वाँटेड म्हणून व्हायरल झाला आहे, तसाच व्हायरल करा असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

आज जे सत्तेत बसलेत त्यांना माहिती नाही की पुढील काळात तुमच्यापैकी अनेक लोक त्या ठिकाणी बसणार आहेत. या लोकांना कदाचित माहिती नसेल की जे येणारं भविष्य आहे ते माझ्यासमोर उभं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पेपरफुटीमुळं विद्यार्थी आत्महत्या करत आहेत : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपकेचे खास आभार मानले.अभिजीत दिपके यानं एक ठिणगी पेटवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो इथं लावले आहेत. स्वतंत्र देशात विद्यार्थी पेपरफुटीमुळ आत्महत्या करत आहेत, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावं लागेल. निवडणुकीला तीन वर्ष आहेत, खूप वेळ आहे, आता आपलं युद्ध सुरु झालं आहे. फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, अभिजीत दिपके तुम्ही दिल्लीत आंदोलन करा, माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे, महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय, याचा अभिमान आहे,  असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईत सभा घेत पाठिंबा दिला होता. यानंतर आज उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले.  ते उद्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget