एक्स्प्लोर

लोकसभेत उदयनराजेंचा शेवटून पहिला नंबर, पहिल्या क्रमांकावर कोण?

तुमचा खासदार कसा आहे? लोकसभेत त्यांनी केलंय तरी काय? सोळाव्या लोकसभेचे शेवटचं अधिवेशन नुकतंच पार पडल्यानंतर एबीपी माझाने खासदारांचं प्रगतीपुस्तक काढलं आहे. कोण आहे शिखरावर...कोण आहे तळात...एक झाडाझडती...

मुंबई : राजेंचा नादच खुळा... कॉलर उडवणं असो किंवा त्यांच्यावर रचलेली गाणी असोत, पण कार्यकर्त्यांमध्ये रमणारा रावडी राजा लोकसभेत मात्र फेल झाला आहे. कारण सातारकरांनी त्यांना जिथे पाठवलं होतं, त्या लोकसभेत त्यांचा नंबर शेवटून पहिला आला आहे. सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे फक्त 27 टक्के दिवसच लोकसभेत हजर होते. त्यांनी एकाही चर्चेत भाग घेतला नाही आणि प्रश्नही विचारला नाही, त्यामुळे ते खालून पहिले आले आहेत. अशोक चव्हाण अर्थात राजेंनी जास्त वाईट वाटून घेऊ नये. कारण नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी तळात राहण्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांनी फक्त 42 टक्केच हजेरी नोंदवली आहे. 898 प्रश्न विचारत त्यांनी नऊ वेळा चर्चेतही भाग घेतला आहे. प्रीतम मुंडे बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी फक्त 54 टक्के हजेरीसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. 449 प्रश्न आणि 32 चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या. संजय जाधव तळातून चौथ्या क्रमांकावर असलेले परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी 55 टक्के दिवस हजर राहत 280 प्रश्न विचारतानाच 21 चर्चांमध्ये भाग घेतला. संजयकाका पाटील पाचवा क्रमांक सांगलीच्या भाजप खासदार संजयकाका पाटलांनी मिळवला आहे. 56 टक्के दिवस ते सभागृहात गेले. तिथे 12 वेळा चर्चांमध्ये सहभागी होत त्यांनी 218 प्रश्न विचारले. लोकसभेत उदयनराजेंचा शेवटून पहिला नंबर, पहिल्या क्रमांकावर कोण? हे झालं तळातील खासदारांचं. पण महाराष्ट्रातून लोकसभेत गेलेल्या काही मोजक्याच खासदारांनी दमदार कामगिरीही केली आहे. पाच वर्षांनंतर राज्यातील लोकसभा खासदारांमध्ये ते देशात टॉपर ठरले आहेत. अरविंद सावंत टेलिफोन निगम कामगारांचे नेते दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत. त्यांनी फक्त दोन टक्के वेळा दांडी मारली आहे. तर तब्बल 98 टक्के दिवस ते लोकसभेत हजर होते. त्यांनी 478 प्रश्न विचारतानाच 286 वेळा चर्चेतही सहभाग घेतला. किरीट सोमय्या दुसऱ्या क्रमांकावर मुंबईकर किरीट सोमय्याच आहेत. ईशान्य मुंबईतील सोमय्यांनी 97 टक्के हजेरी 120 वेळा चर्चेत भाग घेतला आणि 472 प्रश्नही विचारले. सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकावर बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. 96 टक्के दिवस त्या सभागृहात होत्या. तब्बल 1176 प्रश्न विचारण्याचा विक्रम केला आहे. 149 वेळा चर्चेत सहभागी झालेल्या सुप्रिया सुळेंनी 22 खाजगी विधेयकेही सादर केली. सुनील गायकवाड लातूरच्या सुनील गायकवडांनी सुप्रियाताईंएवढीच 96 टक्के हजरी नोंदवली आहे. मात्र त्यांनी 681 प्रश्न विचारत 42 वेळा चर्चेत सहभाग घेतला असला तरी तो सुप्रिया सुळेंपेक्षा कमी असल्याने त्यांचा क्रमांक चौथा ठरला आहे. राहुल शेवाळे मुंबईकरांना असलेले वेळेचं महत्त्व मुंबईतील तिसऱ्या खासदारांनाही पहिल्या पाच जणांमध्ये पोहोचवणारं ठरलं आहे. 94 टक्के दिवस लोकसभेत हजर राहिलेल्या राहुल शेवाळेंनी 841 प्रश्न विचारले तर 208वेळा चर्चेत सहभाग घेतला होता. लोकसभेत उदयनराजेंचा शेवटून पहिला नंबर, पहिल्या क्रमांकावर कोण? महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक तसं लोकशाहीचं सौंदर्य दर्शवणारं आहे. अर्थात लोकसभेत खासदारांची कामगिरी तशी चांगली असली तरी त्यातून मतदारसंघासाठी काय मिळवलं त्यावर त्यांचा खरा निकाल ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget