एक्स्प्लोर
भारतीय तरुणीच्या हातातील फलकाचं मॉर्फिंग, पाकचा बनाव
कलवप्रीत या भारतीय तरुणीनं भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या एका फलकाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
नवी दिल्ली : एका भारतीय तरुणीच्या फोटोतील मजकूर बदलून तो व्हायरल करणं पाकिस्तानच्या संरक्षण खात्याला चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरकडून हे व्हेरिफाईड अकाऊण्ट सस्पेंड करण्यात आलं आहे.
कलवप्रीत या भारतीय तरुणीनं भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या एका फलकाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र माथी भडकवण्याच्या हेतूनं त्या फोटोतील मजकूर बदलून पाकिस्तानच्या संरक्षण खात्यानं तो ट्वीट केला.
भारताविषयी प्रेम असल्याचं सांगणाऱ्या कवलप्रीतच्या मूळ फोटोतील मजकूर बदलून भारताचा द्वेष वाटत असल्याचं लिहिण्यात आलं. त्यामुळे मॉर्फिंग केल्याप्रकरणी पाक संरक्षण खात्याचे कान उपटण्यात आले.
मूळ फलक :
"I am a citizen of India and I stand with secular values of our Constitution. I will write against communal mob lynching of Muslims in our country."
'मी भारताची नागरिक आहे. मी आपल्या संविधानातील सांप्रदायिक मूल्यांच्या बाजूने ठाम उभी राहते. देशातील मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मी आवाज लेखणीच्या माध्यमातून उठवणार' असं कलवप्रीतने लिहिलं आहे.
बदललेला मजकूर :
"I am an Indian but I hate India because India is a colonial entity that has occupied nations such as Nagas, Kashmiris, Manipuris, HyderabadJunagard, Sikkim, Mizoram Goa."
'मी भारतीय आहे, पण मला भारताचा तिरस्कार वाटतो. भारतात वसाहतवाद आहे, ज्यात नागा, काश्मिरी, मणिपुरी, हैदराबाद, जुनागड, सिक्कीम, मिझोरम, गोवा अशा प्रदेशांचा समावेश आहे.'
या प्रकाराची तक्रार दिल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण खात्याचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं गेलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement