(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahua Moitra : अदानी प्रकरणावरून संसदेत तोफ डागणाऱ्या खासदार महुआ मोईत्रा अडचणीत; वकिलाने केस सोडली, कुत्र्यावरून वाद अन् मित्रच दुश्मन झाल्याची चर्चा!
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्यावर संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून महुआ यांनी दुबे यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
नवी दिल्ली : आपल्या तडाखेबाज भाषणांनी प्रसिद्ध असलेल्या आणि अदानी प्रकरणावरून संसदेत हल्लाबोल केलेल्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra Cash For Question Case) अडचणीत आल्या आहेत. कुत्र्याच्या ताब्यावरून वाद सुरु झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात भाजप नेते निशिकांत दुबे यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, त्यांच्या वकीलांनी केस सोडली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्यावर संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून महुआ यांनी दुबे यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, महुआ यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने या खटल्यातून माघार घेतली.
अदानींविरोधात जोरदार आवाज उठवणाऱ्या खासदार मोएत्रा कशा अडचणीत आल्यात/ आणल्या जातायत पाहा
— Prashant Kadam (@_prashantkadam) October 19, 2023
मोएत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता
या प्रकरणात आता नवीच घडामोड
या केसमध्ये दर्शन हिरानंदानी हे माफीचे… pic.twitter.com/DEWy31IiIX
महुआ यांच्या वकिलाने या प्रकरणातील हितसंबंधांचे कारण सांगून या खटल्याचा बचाव करण्यास नकार दिला. महुआ मोइत्रा यांचे मित्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहदराई हे महुआचे वैयक्तिक मित्र आहेत. त्यांनी न्यायालयात सांगितले की, महुआचे वकील गोपाल शंकरनारायण यांनी फोन करून केस मागे घेण्यास सांगितले, ज्याचे कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत जर असे असेल तर शंकरनारायण या खटल्याची बाजू कशी मांडू शकतात? असे न्यायाधीश म्हणाले. यानंतर गोपाल शंकरनारायण यांनी या प्रकरणापासून दूर झाले.
अनंत देहदराई यांनी महुआ कोणते आरोप केले आहेत?
महुआ मोइत्रा याच्या वर्तनावर मित्र उद्योगपती अनंत देहराई यांनी गंभीर आरोप केले आहेत. देहराई यांनी महुआ मोईत्रांवर पैशांबाबत प्रश्न विचारल्याचा आरोप करणारे पत्र लिहिले होते. याबाबत महुआ आणि देहदराई यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या भांडणात हेन्री नावाचा कुत्रा आहे. हा कुत्रा सध्या महुआ यांच्याकडे असून देहदराई यांना त्याचा ताबा हवा आहे. महुआ यांनी पैसे घेऊन प्रश्न विचारल्याबद्दल देहदराई यांनी सीबीआयकडे तक्रार केली आहे. तेव्हा महुआ मोईत्रा यांच्या वकिलाने कथितपणे देहदराई यांना फोन केला आणि तक्रार मागे घेण्याची विनंती केली आणि ती कुत्रा परत करेल असेही सांगितले. देहराई यांनी हा कॉल रेकॉर्ड करून खंडपीठासमोर मांडला.
प्रकरण नेमकं काय?
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा पैसे घेऊन प्रश्न विचारल्यामुळे चर्चेत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांना देहादराई यांनी पत्र पाठवून मोईत्रा यांच्याकडून पैसे कसे घेतले, याची माहिती दिली. या प्रकरणात दर्शन हिरानंदानी या व्यावसायिकाचे प्रतिज्ञापत्र समोर आले असून, त्यात महुआ यांना प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिल्याचे कबूल केले आहे. याशिवाय महुआच्या सरकारी बंगल्याचे नूतनीकरण करून अनेक ब्रँडेड वस्तू भेट दिल्याचा दावा त्यांनी केला. त्या बदल्यात त्यांना त्यांचा संसदीय लॉगिन आयडी दिला होता, ज्याद्वारे ते संसदेत प्रश्न विचारायचे.
इतर महत्वाच्या बातम्या