एक्स्प्लोर
हिजबुलचा पोस्टरबॉय, दहशतवादी बुरहान वाणीला कंठस्नान
अनंतनाग : हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेज दहशतवादी बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात अखेर यश आलंय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बुरहानला लष्कारानं कंठस्नान घातलंय. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं आहे.
गेल्या 24 वर्षांत स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला कमांडर होता. सोशल साईट्सवर त्याने आपला जम बसवला असून हिजबुलचा पोस्टरबॉय अशी त्याची ओळख होती. बुरहानसोबत ज्या दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यांचा वेगवेगळ्या चकमकीत मृत्यू झाला आहे.
बुरहानचा खात्मा हा सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने मोठं यश मानलं जात आहे. हिजबुलसाठी बुरहानचा मृत्यू हा तितकाच मोठा धक्का आहे, असं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement