(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Today In History : 163 वर्षांनंतर पोस्टाची तार सेवा बंद, इतिहासात आज
On this day in history july 14th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते.
On this day in history july 14th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत शंकरराव चव्हाण यांचा जन्म त्याशिवाय आजच्याच दिवशी 2013 मध्ये पोस्ट ऑफिसची तार सेवा कायमस्वरुपी बंद करण्यात आली. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी कऱ्हाडमधील टेंभू येथे झाला. गोपाळ गणेश आगरकर महान सामाजसुधारक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ होते. ब्रिटीशांच्या काळात त्यांनी भारतीय समाजात जाती प्रणाली आणि अस्पृश्यतेसारख्या कुरोतियांना काढून टाकण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
गोपाळ गणेश आगरकर हे लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि ’केसरी’चे पहिले संपादक होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणतज्ञ होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत शंकरराव चव्हाण यांचा जन्म
महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी झाला होता. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव चव्हाण यांनी मोठी भरारी घेतली. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे.
163 वर्षांची तार सेवा बंद
आजच्याच दिवशी 2013 मध्ये पोस्ट ऑफिसची तार सेवा कायमस्वरुपी बंद करण्यात आली. जवळपास 163 वर्षांपासून ही सेवा सुरु होती. आजमितीला भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून आहे. पण अधुनिकतेच्या काळात तार सेवा फिकी पडली, त्यामुळे डाक विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
फ्रेंच क्रांतीची सुरुवात -
1789 मध्ये आजच्याच दिवशी फ्रेंच क्रांतीची सुरुवात झाली. पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. या लोकांनी आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरवात होती.
1223 : फिलिप द्वितीयच्या निधनानंतर त्यांचा मुलगा लुई फ्रान्सचा राजा झाला.
1636 : मुगल बादशाह शाहजहाने औरंगजेबला दक्कनचा प्रमुख म्हणून नियुक्त केले.
1789 : फ्रेंच क्रांतिला सुरुवात झाली. पॅरिसच्या जनतेने बास्टिलच्या तुरुंगावर कब्जा मिळवला.
1850 : मशिनद्वारे तयार करण्यात आलेल्या बर्फाचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन झाले.
1914 : रॉबर्ट एच. गोगार्ड यांना पहिल्या द्रव-इंधन रॉकेटच्या डिझाइनसाठी पेटंट मिळाले.
1927 : विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण हवाई बेटांवर सुरू होते.
1940 : दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीच्या विमानांनी स्वेजवर हल्ला केला.
1951 : सीबीएस चॅनलवर घोड्यांच्या शर्यतीच्या स्वरूपात क्रीडा स्पर्धेचे पहिले रंगीत प्रसारण झाले.
1965 : मंगळाच्या जवळून जाणाऱ्या नासाच्या अंतराळयानाने दुसऱ्या ग्रहाची पहिल्यांदाच जवळून छायाचित्रे घेतली.
1969 : जयपूरमध्ये मालगाडी आणि ट्रेन यांच्यात टक्कर, 85 जणांचा मृत्यू
1969 : अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाने आणि फेडरल रिजर्व्ह सिस्टमने 500, 1,000, 5,000 आणि 10,000 डॉलरच्या नोटा बंद केल्या.
1972 : तत्कालीन सोव्हिएत युनियनने भूमिगत अणुचाचणी केली.
1987 : तायवानमध्ये 37 वर्षांनतर मार्शल कायदा संपला
1991: इराकमधून ब्रिटनचे लष्कर माघारी फिरले.
1996 : ब्राऊन अमेंडमेंट अंतर्गत अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रे पाठवायला सुरुवात केली.
2003 : जागतिक बुद्धिबळ महासंघाद्वारे भारतीय बुद्धिबळ खेळाडू संदीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार देण्यात आला.
2008 : नेपाळच्या कार्यकारी संसदेने पंतप्रधान निवडण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक मंजूर केले.
2014 : इंग्लंडमधील चर्चमध्येही महिलांना बिशप बनवण्याच्या बाजूने मतदान केले.
2015 : नासाचे न्यू होरायझन्स हे प्लुटोला भेट देणारे पहिले अंतराळयान ठरले आहे.