एक्स्प्लोर

School Re-opening: दिल्लीसह बिहार, गुजरात आणि केरळमधील शाळा आजपासून सुरू, निर्बंध केले शिथील

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक राज्यात निर्बंध शिथील केले आहेत. आजपासून बिहार, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील शाळा महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.  

School Re-opening: कोरोना रुग्णांची संख्या देशात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये निर्बंध शिथील होत आहेत. आजपासून दिल्लीतील शाळा, महाविद्यालये, जीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीबरोबर अन्य काही राज्यांमध्ये देखील आजपासून शाळा सुरू होणार आहेत. यामध्ये बिहार, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमधील शाळा, महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
बिहार 

बिहारमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, राज्य सरकारने रविवारी शाळा पुन्हा सुरू करण्याचा आणि रात्रीचा कर्फ्यू उठवण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच इतर अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर, नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर जाहीर केले की, सोमवारपासून आठवीपर्यंतच्या वर्गांना 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर नववीच्या पुढील वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) चैतन्य प्रसाद यांनी सांगातिसले की, 6 जानेवारीपासून लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्यू, जो रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू होता, तोही उठवला जात आहे. सिनेमा हॉल, जिम, मॉल्स आणि स्विमिंग पूल यांनाही 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी असेल. दुकाने रात्री आठ वाजता बंद करण्याच्या नियमातूनही सूट देण्यात आली आहे. तथापी, सर्व आस्थापनांना कोविड प्रतिबंधाशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे लागणार आहे. विवाहसोहळा आणि अंत्यसंस्कारांना 50 ऐवजी 200 लोक उपस्थित राहू शकतात. ही मार्गदर्शक तत्त्वे 7 फेब्रुवारीपासून लागू होतील जी 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर कोविड परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. 


गुजरातमध्ये पहिली ते नववीपर्यंत शाळा सुरू होणार 

कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे गुजरात सरकारने 7 फेब्रुवारीपासून इयत्ता 1 ली ते 9 वी च्या शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कोविड-19 ची परिस्थिती पाहता सरकारी, खासगी आणि अनुदानीत शाळा सोमवारपासून इयत्ता 1 ते 9 पर्यंतचे ऑफलाईन अभ्यास पुन्हा सुरू करू शकतात. मात्र, ऑफलाईन शिक्षण पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही माध्यम निवडू शकतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढल्यानंतर या वर्गांसाठी ऑफलाईन अभ्यास स्थगित करण्यात आला होता. 

केरळमध्ये 10 वी ते 12 वी चे वर्ग सुरू होणार 

केरळमध्ये कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे, राज्य सरकारने 7 फेब्रुवारीपासून इयत्ता 10 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात , 7 फेब्रुवारीपासून 10 वी, 11वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. तर इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी पर्यंतच्या मुलांसाठी आणि बालवाडीतील मुलांसाठी 14 फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होतील. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्येही आजपासून इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. राज्य सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे.  त्यानुसार, कोरोनाची परिस्थिती पाहता 7 फेब्रुवारीपासून प्रत्येक परिसर प्राथमिकपासून मुलांसाठी खुला असेल. इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण सत्र आयोजित केले जाईल.  दरम्यान, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी देखील आजपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 14 फेब्रुवारीपासून नर्सरी ते आठवीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget