एक्स्प्लोर

खात्यात किमान रक्कम नसल्याने दंड बसतोय? ही काळजी घ्या

केवळ स्टेट बँकच नाही, तर अनेक सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने खात्यांमध्ये किमान रक्कम नसल्यामुळे लागणाऱ्या चार्जच्या रुपात 1771 कोटी रुपये वसूल केले आहेत. हा आकडा एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2017 या काळातील आहे. केवळ स्टेट बँकच नाही, तर अनेक सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे. तुम्हालाही हा भुर्दंड बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. बँकांनी 2016-17 च्या तुलनेत 2017-18 मध्ये अनेक पटींनी शुल्क वसूल केलं आहे. 2016-17 मध्ये बँकांनी 864 कोटी रुपये सरचार्ज म्हणून वसूल करण्यात आले, तर 2017-18 मध्ये नोव्हेंबरपर्यंतच बँकांनी 2361 कोटी रुपये चार्ज म्हणून वसूल केले. सर्वसामान्यांच्या खिशाला कशी कात्री लावली जात आहे, ते या आकड्यांमधून स्पष्ट दिसत आहे. 2017-18 मध्ये पंजाब नॅशनल बँकने 97 कोटी, सेंट्रल बँक 69 कोटी, इंडियन बँक 51 कोटी, कॅनरा बँक 62 कोटी, आयडीबीआय बँक 52 कोटी आणि युनियन बँकेने चार्ज म्हणून 33 कोटी रुपये सर्वसामान्यांकडून वसूल केले आहेत. खात्यात किती किमान रक्कम असावी याची माहिती खातेधारकांना अगोदरच दिली जावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेला आहे. शिवाय किमान रक्कम न ठेवल्यामुळे किती चार्ज लागतो, त्याचीही माहिती देण्याचा आदेश आरबीआयने दिला आहे. एखाद्या खातेधारकाच्या खात्यात किमान रक्कम नसेल तर त्याला मेसेजद्वारे कळवण्यात यावं आणि पैसे जमा करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा, असा आदेश आरबीआयने 2014 साली दिला होता. स्टेट बँकेसाठी मेट्रो शहरांमध्ये 3 हजार, शहरांमध्ये 2 हजार आणि ग्रामीण भागामध्ये 1 हजार रुपये किमान रक्कम ठेवण्याची मर्यादा आहे. जनधन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या खातेधारकांना चार्ज आकारला जात नाही. या दंडापासून वाचण्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किमान रकमेविषयीची माहिती घ्या, जेणेकरुन तुम्हाला दंड म्हणून पैसे भरावे लागणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

बार कौन्सिल ऑफ इंडियाला कायद्याच्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार नाही; न्यायालयाने सर्वोच्च निर्वाळा देत तो आदेश बेकायदेशीर केला घोषित
बार कौन्सिल ऑफ इंडियाला कायद्याच्या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार नाही; न्यायालयाने सर्वोच्च निर्वाळा देत तो आदेश बेकायदेशीर केला घोषित
साखरेच्या दरात 30 टक्क्यांची घसरण! मात्र, ग्राहकांना दिलासा नाहीच, महाग दरातच खरेदी करावी लागतेय साखर, नेमकं कारण काय? 
साखरेच्या दरात 30 टक्क्यांची घसरण! मात्र, ग्राहकांना दिलासा नाहीच, महाग दरातच खरेदी करावी लागतेय साखर, नेमकं कारण काय? 
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
पाकिस्तानचं विमान पाडणारा योद्धा आता नवीन भूमिकेत, विमानसेवेच्या क्षेत्रात टाकलं पुढचं पाऊल, काय असणार भूमिका?
पाकिस्तानचं विमान पाडणारा योद्धा आता नवीन भूमिकेत, विमानसेवेच्या क्षेत्रात टाकलं पुढचं पाऊल, काय असणार भूमिका?

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? आकडेवारी सांगत कर्जाबाबत म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? कर्जाबाबत म्हणाले...
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
Nagpur DJ Ban : इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 
Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्यासारख्या छोट्या नेत्याला...'
एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्यासारख्या छोट्या नेत्याला...'
Devendra Fadnavis and Krishnaraj Mahadik: मनसेविरुद्धच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण कृष्णराज महाडिकांवर का रागावले? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
मनसेविरुद्धच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण कृष्णराज महाडिकांवर का रागावले? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
Embed widget