एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीत तीन बहिणींचा भूकबळी, न्यायालयीन चौकशी होणार!
मुलींना अनेक दिवसांपासून उलट्या आणि जुलाब सुरु होते. तरीही त्यांना घरातच ठेवलं होतं. त्यांच्यावर उपचारही केले नाहीत. शिवाय त्यांना जेवण दिलं नाही
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत तीन निष्पाप मुलींचा उपासमारी आणि कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या मंडावली परिसरात एका कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. अनेक दिवसांपासून त्यांना जेवण मिळालं नव्हतं. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, त्यांचा मृत्यू कुपोषण आणि उपासमारीमुळे झाला आहे. मंगळवारी पहाटे घरात त्या बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. शेजारी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पुन्हा शवविच्छेदन
शिखा (वय 8 वर्ष), मानसी (वय 4 वर्ष) आणि पारुल (वय 2 वर्ष) अशी मृत मुलींची नावं आहेत. डॉक्टरांच्या एका पथकाने दुसऱ्यांदा त्यांचं पोस्टमॉर्टेम केलं. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी सांगितलं की, मुलींच्या पोटात अन्नाचा एकही दाणा सापडला नाही. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना सात ते आठ दिवस जेवण मिळालं नव्हतं, ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. परिणामी उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी तिन्ही मुलींचे मृतदेह आईच्या ताब्यात देण्यात आले. शेजारऱ्यांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
आई मानसिकदृष्ट्या दुबळी, वडील बेपत्ता
या मुलींची आई वीणाची मानसिक अवस्था ठीक नाही. "मुलींना अनेक दिवसांपासून उलट्या आणि जुलाब सुरु होते. तरीही त्यांना घरातच ठेवलं होतं. त्यांच्यावर उपचारही केले नाहीत. शिवाय त्यांना जेवण दिलं नाही," असं आईने सांगितलं. तर मुलींचा वडील मंगल सिंह काही वर्षांपासून रिक्षा चालवत होते. मंगल सिंहचा मित्र नारायण यादवच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांची रिक्षा चोरीला गेली होती, त्यामुळे घरमालकाने त्याला घराबाहेर काढलं. कारण रिक्षा घरमालकाचीच होती. यानंतर नारायण यादवने आपल्याच घरात मंगलसिंहच्या कुटुंबाला राहण्यास जागा दिली.
आपल्या कुटुंबाला नारायण यादवच्या घरी सोडून मंगल नव्या कामाच्या शोधात घराबाहेर पडला. मंगळवारी सकाळी नारायण यादव त्याच्या घरी गेला असता, तिन्ही मुली बेशाद्धावस्थेत सापडल्या आणि आई घरातच होती. नारायण यादव आणि शेजाऱ्यांना मुलींना लाल बहादूर शास्त्र रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. "मुलींना जेवण मिळत नाही हे आधी माहित असतं, तर नक्कीच त्यांना जेवण दिलं असतं. पण हे कुटुंब दोनच दिवसांपूर्वी इथे आला होतं, त्यामुळे त्यांच्याबाबत फारशी माहिती नव्हती," असं शेजारी म्हणाले.
सामाजिक संघटनांचा सरकारवर निशाणा
या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटना सरकारवर नाराज आहेत. 'बचपन बचाओ' आंदोलनाचे संचालक राकेश सेंगर म्हणाले की, "ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे. संसदेपासून काही किलोमीटर अंतरावर हे घडलं आहे. सरकारला लाज वाटायल हवी. प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण समिती असते, जी मुलांच्या शिक्षण, पोषण आणि त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवते, ती काय करत आहे?"
न्यायालयीने चौकशीचे आदेश
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी तिन्ही मुलींच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीने चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच या मुद्द्यावर राजकारणही सुरु झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement