एक्स्प्लोर

बॅटरी चोरीच्या संशयाने जमावाची मारहाण, एकाचा मृत्यू

मॉब लिंचिंगची अजून एक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. दिल्लीत बॅटरी चोरीच्या संशयाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत 'मॉब लिंचिंग'ची घटना घडली आहे. दिल्लीच्या उत्तर नगरमध्ये बॅटरी चोरी केल्याच्या संशयातून जमावाने तीन जणांना बेदम मारहाण केली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश सक्सेना असे मृत तरुणाचे नाव असून तो ऑटो रिक्षा चालवत होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दोन प्रवाशांना घेऊन अविनाश हा रिक्षाचालक शनिवारी सकाळी दिल्लीतल्या मोहन गार्डन परिसरात काही साहित्य खरेदी करण्यासाठी गेला होता. अविनाश रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवून लघुशंकेसाठी गेला होता. परत आल्यावर त्याने पाहिले की, त्याच्या गाडीतील प्रवासी काही बॅटरीज घेऊन आले आहेत. त्यासोबतच रिक्षाला जमावाने घेरले आहे. अविनाशच्या रिक्षात बसलेले दोन्ही प्रवासी मुन्नीपाल आणि सूरज यादव हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. या दोघांनी चोरलेल्या बॅटरीज ते रिक्षात ठेवत होते. त्यावेळी परिसरातील लोकांच्या लक्षात आले की, दोन जण बॅटरीज चोरत आहेत. त्यामुळे जमावाने या दोघांना मारहाण सुरु केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी मुन्नीपाल आणि सूरजने जमावाला सांगितले की रिक्षा चालक अविनाश आमचाच सहकारी आहे. त्यामुळे जमावाने अविनाशला मारायला सुरुवात केली. जमावाने अविनाशला विजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. तसेच मारहाण करत असताना अविनाशच्या घरी फोन करुन त्याचे आई-वडील आणि बायकोला बोलावले. त्याचे आई-वडील आणि बायको घटनास्थळी आले तेव्हा अविनाशला लोक मारहाण करत होते. या मारहाणीत अविनाशचा मृत्यू झाला. अविनाशची पत्नी कुसुम लता हिने अविनाशला मारहाण करणाऱ्या 5-6 लोकांना ओळखले आहे. परंतु दिल्ली पोलीस कारवाई करण्यात दिंरगाई करत असल्याचे कुसुम लता हिचे म्हणणे आहे. अद्याप बाकिच्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
Cockroach Janta Party : 'एकतर त्यांनी जंतर-मंतरवर यावं नाहीतर...', कॉकरोच जनता पार्टीने सरकारसोबतच्या चर्चेसाठी ठेवली ही अट, म्हणाले 'सरकारने पहिल्याच दिवशी...'
'एकतर त्यांनी जंतर-मंतरवर यावं नाहीतर...', कॉकरोच जनता पार्टीने सरकारसोबतच्या चर्चेसाठी ठेवली ही अट, म्हणाले 'सरकारने पहिल्याच दिवशी...'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Embed widget