एक्स्प्लोर

सैन्यभरती पेपर फुटी प्रकरणात लष्करातील 3 क्लर्क मास्टरमाईंड

ठाणे : लष्करी भरती परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. या पेपर फुटीप्रकरणात लष्करात काम करणारे तीन क्लर्क मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रवींद्र कुमार, धर्म सिंह, निर्गम कुमार पांडे अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघे नागपुरातून हा गोरखधंदा करत होते. त्यात त्यांना लष्करातील काही जवान आणि निवृत्त अधिकाऱ्यांची मदत होत असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. लवकरच या तिघांना अटक करण्यात येईल. पेपर फुटीची सुरुवात रवींद्र कुमार, धर्म सिंह, निर्गम कुमार पांडे हे तिघेही खाजगी क्लासेसला मदत करायचे. रवींद्र कुमार काही दिवसांपूर्वी परीक्षेला आलेल्या काही मुलांना भेटला. त्याने मुलांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि मुलांनी ही माहिती सातारा जिल्ह्यातील फलटणमधील छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी अॅकॅडमी चालवणाऱ्या अाप्पा जाधव आणि संतोष शिंदे यांना दिली. इथूनच या गोरखधंद्याची सुरुवात झाली. दिल्लीत पेपर तयार झाल्यानंतर ते सीडीने विविध केंद्रांवर पाठवले जात होते. हे तिन्हीही क्लर्क पेपरची सीडी आपल्या कंप्युटरमध्ये टाकल्यानंतर ती परीक्षेच्या एक दिवस अगोदर व्हॉट्सअॅपद्वारे मुलांना पाठवत होते.  त्यामुळे ठाणे पोलिसांनी आता या पेपरने पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही शोध घेणं सुरु केलं आहे. शिवाय यातून झालेल्या कमाईचाही आढावा घेतला जात आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही सर्व माहिती लष्कराला दिली असून तिन क्लर्कला लवकरच अटक केली जाणार आहे. शिवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याचीही माहिती आहे. काय आहे प्रकरण? सैन्यभरतीचा पेपर फुटल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने देशभरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींसह शेकडो विद्यार्थ्यांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये सैन्याशी निगडीत काही जणांचा समावेश आहे. रविवारी नियोजित असलेल्या सैन्यभरतीचे पेपर आधीच फुटल्याने देशभरात अटकसत्र सुरु झालं. पहाटे ठाणे क्राईम ब्रांचने नागपूर, पुणे आणि गोव्यातून अनेक विद्यार्थी आणि दलालांना अटक केली आहे. नागपूरच्या पार्वती नगर येथील मौर्य सभागृहातून पहाटे 4 वाजताच्या सुमारास ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकानं आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर पुण्याच्या हडपसरमधून दोन जणांना अटक केली. या दोघांनी 70 जणांना प्रत्येकी तीन लाख रुपयांत पेपर वाटल्याची माहिती आहे. ठाणे पोलिसांची याप्रकरणी चौकशी चालून असून ठिकठिकाणी धाडसत्र सुरु आहे.

संबंधित बातमी : सैन्यभरतीचा पेपर लीक, 18 जणांसह 350 विद्यार्थी अटकेत

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget