(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक
केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये एनआयए (NIA) नं अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अशातच आता पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील रजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त करण्यात आला. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या एका संयुक्त पथकाने दहशतवादी शोधक मोहीमेतंर्गत अटक करण्यात आली आहे.
दोन एके-56 रायफल, दोन पिस्तुल, चार ग्रेनेड जप्त
जम्मू-काश्मीरचे आयजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडे दोन दोन एके-56 रायफल, दोन पिस्तुल, चार ग्रेनेड आणि 1 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवादी दक्षिण काश्मिरमध्ये राहत होते आणि त्यांचं वय 19 ते 25 वर्षांमध्ये आहे.
NIA ने अलकायदाच्या 9 दहशतवाद्यांना केली अटक
देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला मोठा धक्का देण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आलं आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये एनआयए (NIA) नं अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. आज एनआयएच्या टीमनं अनेक ठिकाणी छापे मारत कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्णाकुलममध्ये रेड मारत ही कारवाई केली. एनआयएनं म्हटलं आहे की, सर्व अटक केलेले संशयित हे दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत.
एनआयएनं सांगितलं आहे की, सुरुवातीच्या चौकशीनुसार अटक केलेल्या सर्वजणांना सोशल मीडियावरुन पाकिस्तान स्थित अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून द्वारा कट्टरपंथी बनवलं होतं. राजधानी दिल्लीसह देशातील काही ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केलं जात होतं. एआयएनं म्हटलं आहे की, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केलं जाऊ शकतं.
दरम्यान, ही टोळी मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचे धंदे करायची. यातील काही सदस्य हत्यारं आणि गोळाबारुदांच्या खरेदीसाठी दिल्लीला येण्याची योजना आखत होते, अशी माहिती आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली. यानंतर अल-कायदाच्या या 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मोठी कारवाई : अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का, NIAच्या छापेमारीत 9 संशयित दहशतवाद्यांना अटक