एक्स्प्लोर
Advertisement
मोठी कारवाई : अल-कायदाच्या मॉड्यूलला धक्का, NIAच्या छापेमारीत 9 संशयित दहशतवाद्यांना अटक
देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला मोठा धक्का देण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आलं आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये एनआयए (NIA) नं अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे.
नवी दिल्ली: देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या अल-कायदाच्या मॉड्यूलला मोठा धक्का देण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आलं आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये एनआयए (NIA) नं अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. आज एनआयएच्या टीमनं अनेक ठिकाणी छापे मारत कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्णाकुलममध्ये रेड मारत ही कारवाई केली. एनआयएनं म्हटलं आहे की, सर्व अटक केलेले संशयित हे दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत.
एनआयएनं सांगितलं आहे की, सुरुवातीच्या चौकशीनुसार अटक केलेल्या सर्वजणांना सोशल मीडियावरुन पाकिस्तान स्थित अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून द्वारा कट्टरपंथी बनवलं होतं. राजधानी दिल्लीसह देशातील काही ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केलं जात होतं. एआयएनं म्हटलं आहे की, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केलं जाऊ शकतं. ही टोळी मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचे धंदे करायची. यातील काही सदस्य हत्यारं आणि गोळाबारुदांच्या खरेदीसाठी दिल्लीला येण्याची योजना आखत होते, अशी माहिती आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली. यानंतर अल-कायदाच्या या 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे.The module was actively indulging in fundraising & a few members of gang were planning to travel to New Delhi to procure arms and ammunition. These arrests have pre-empted possible terrorist attacks in various parts of the country: NIA on the arrest of 9 Al-Qaeda terrorists https://t.co/YEnEfJotLw
— ANI (@ANI) September 19, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
राजकारण
Advertisement