एक्स्प्लोर
देशातील दहा सर्वात 'हॉट' शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन अव्वल
मुंबई : देशातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या 10 शहरांमध्ये विदर्भातली तीन शहरं अव्वल स्थानी आहेत, तर एकूण चार शहरांचा यादीत समावेश आहे. स्कायमेटनं जाहीर केलेल्या आकडेवारीत चंद्रपूर, नागपूर आणि ब्रम्हपुरीचा क्रमांक लागतो.
चंद्रपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसऱ्या स्थानी नागपूर असून शहरात 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी हे या यादीत 43.3 अंश सेल्सिअस तापमानासह तिसऱ्या स्थानी आहे.
दहा शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील चार, तर ओदिशातील चार शहरांचा समावेश आहे. अकोला शहर सहाव्या स्थानावर असून अकोल्यातही काल 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात ही वाढ दिसून येत आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात या तापमानात घट होईल.
शहर | राज्य | तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) |
चंद्रपूर | महाराष्ट्र | 44.2 |
नागपूर | महाराष्ट्र | 43.3 |
ब्रह्मपुरी | महाराष्ट्र | 43.3 |
कुर्नूल | आंध्र प्रदेश | 42.8 |
झारसुगुडा | ओदिशा | 42.8 |
अकोला | महाराष्ट्र | 42.6 |
भवानीपटणा | ओदिशा | 42.5 |
सुंदरगड | ओदिशा | 42.5 |
तितलागड | ओदिशा | 42.1 |
गुलबर्ग | कर्नाटक | 42.1 |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement