सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात धमकीचा ईमेल; तीन राज्यांत 200 किलो RDX पोहोचवल्याचा उल्लेख
सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात साधारणतः पाच दिवसांपूर्वी धमकीचा मेल आलं होतं. या पत्रात सार्वजनिक ठिकाणं मंदिरं, विमानतळं, मल्टिप्लेक्सच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा मेल चौकशीसाठी एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
मुंबई : सीआरपीएफच्या मुंबईच्या मुख्यालयात धमकीचा मेल करण्यात आला आहे. या मेलमध्ये मंदिरं, विमानतळं आणि मल्टिप्लेक्सला टार्गेट करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात आलेला हा मेल पुढच्या तपासासाठी एनआयएकडे पाठवण्यात आला आहे. एवढंच नाहीतर 3 राज्यांमध्ये तब्बल 200 किलो आरडीएक्स पोहोचवण्यात आल्याचाही या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात साधारणतः पाच दिवसांपूर्वी धमकीचा मेल आलं होतं. या पत्रात सार्वजनिक ठिकाणं मंदिरं, विमानतळं, मल्टिप्लेक्सच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा मेल चौकशीसाठी एनआयएकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. तसेच 200 किलो आरडीएक्स तीन राज्यांमध्ये पाठवण्यात आलं असल्याचंही या पत्रातून सांगण्यात आलं आहे. अकरापेक्षा जास्त अतेरिकी देशात दबा धरुन बसल्याचंही या पत्रातून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावांचा उल्लेखही या मेलमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, धमकीच्या मेलमध्ये हिंदूमध्ये मजकूर लिहिण्यात आलेला आहे. ईमेलच्या शेवटी ईमेल पाठविणाऱ्याने म्हटले आहे की, ''आम्ही अज्ञात आहोत. आम्ही एक आर्मी आहोत. आम्ही माफ करत नाही. आम्ही विसरत नाही. आमची वाट पाहा''. या मेलनंतर तपास यंत्रणा संपूर्ण ताकदीनिसी मेलचा स्त्रोत शोधत आहेत. तसेच, ईमेलची सत्यताही पडताळत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :