एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, केरळच्या मंदिरात धमकीचे पत्र आढळले : सूत्र
ही धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता गुप्तचर यंत्रणेकडून ही धमकी कुणी दिली याचा शोध घेतला जात आहे.

नवी दिल्ली : केरळ दौऱ्यावर असताना मोदींना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा खुलासा झाला आहे. या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी मोदींनी भेट दिलेल्या गुरुवायुर मंदिराच्या ऑफिसमध्ये एक पाकिट सापडलं होतं. त्यात पाचशेच्या नोटेवर मल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, अशी माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या मंदिर भेटीआधी ही धमकी मिळाली होती. 8 जूनला मोदी केरळ दौऱ्यावर असताना त्यांनी गुरुवायूर मंदिराला भेट देऊन तिथे तुला केली होती. त्यांच्या वजनाएवढं दान त्यावेळी मोदींनी केलं होतं. त्यानंतर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांकडून मोदींच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. त्रिशुरच्या गुरुवायुर मंदिराच्या कार्यालयात एका पाकिटामध्ये पाचशे रुपयांच्या नोटेवर लिहून ही धमकी देण्यात आली होती. यामध्ये मोदींना जीवे मारले जाईल. त्यांचा गळा कापला जाईल, अशी धमकी मल्याळम भाषेत लिहिली होती. ही धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता गुप्तचर यंत्रणेकडून ही धमकी कुणी दिली याचा शोध घेतला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव आणि श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी या मंदिरात गेले होते. यावेळी त्यांनी इथे पूजा देखील केली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























