एक्स्प्लोर

Monsoon News : दिलासादायक! यंदा वरुणराजाचं आगमन लवकरच, 10 दिवस आधीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार

देशातील नागरिकांसाठी एक खुशखबर आली आहे. यावर्षी देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे.

Monsoon News : सध्या देशात उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होत आहे. अशातच देशातील नागरिकांसाठी एक खुशखबर आली आहे. यावर्षी देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा 21 मे रोजी  केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार असल्याचा अंदाज 'युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट' या संस्थेने वर्तवला आहे.

मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज आहे, त्यामुळे अशा काळातच पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना हा दिलासा म्हणावा लागेल. दरम्यान, दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. हवामान विभागाने अंदाज जाहीर केल्यानंतर आता युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट या संस्थेने दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.
 
जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने 14 एप्रिलला जाहीर केला होता. हा पहिला अंदाज आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget