तिरुपती ट्रस्टने सरकारकडे 50 कोटींचे जुने चलन बदलण्याची केली मागणी
कोरोना आणि लॉकडाउनमुळे तिरुपती बालाजी मंदिरातील दान खूप कमी झाले आहे. परंतु 11 जूनपासून मंदिर उघडल्यानंतर फक्त एका महिन्यात मंदिरात 17 कोटी रुपयांचे दान आले. हे कोरोनापूर्वी येणाऱ्या दानाच्या 10 टक्केही नाही.
मुंबई : नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर बंद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आजही मंदिरात दान केल्या जात आहेत. आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात मागील काही महिन्यात तब्बल 50 कोटींच्या जुन्या नोटा दान करण्यात आल्या आहेत. तिरुपती ट्रस्टचे अध्यक्ष वाईवी सुब्बारेड्डी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन, या जुन्या नोटा बदलून देण्याची मागणी केली आहे.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे तिरुपती बालाजी मंदिरातील दान खूप कमी झाले आहे. परंतु 11 जूनपासून मंदिर उघडल्यानंतर फक्त एका महिन्यात मंदिरात 17 कोटी रुपयांचे दान आले. हे कोरोनापूर्वी येणाऱ्या दानाच्या 10 टक्केही नाही. यातच आता मंदिर ट्रस्टने दानमध्ये आलेल्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांतून मंदिराला आर्थिक सहाय्यता देण्याची योजना आखली आहे. या नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या नंतर आल्यामुळे मंदिराला यांना सांभाळणेही कठीण झाले आहे.
मंदिराशी निगडीत एका सूत्रांने सांगितले की, या नोटा अनेक दिवसांपासून दानमध्ये येत आहेत. लॉकडाऊनमुळे याबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, अशा विशेष परिस्थितीत नोटा बदलून दिल्यास मंदिराला मोठी आर्थिक सहाय्यता होईल. परंतू, मंदिर प्रशासनाकडून अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत कोणताच तपशील जाहीर झाला नाही. पीआरओ टी रवीने सांगितले की, अद्याप याबाबत माहिती देण्यास मंदिराकडून नकार देण्यात आला आहे.
Gold Treasure in Temples | देशातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी कोणत्या मंदिराकडे किती सोनं?