Antilia Explosives Scare | स्फोटक प्रकरणात NIA ला राज्याचे संपूर्ण सहकार्य, अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्पोटक सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरुन शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्र्यांवर नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यावरुन राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नवी दिल्ली : मुकेश अंबानी याच्या घरासमोर स्पोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत असून एनआयएला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पोटक सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती.
Sachin Vaze | 'त्या' दिवसांपर्यंत सचिन वाझे सतत मनसुख हिरण यांच्याशी संपर्कात, सीडीआरमधून माहिती
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "विदर्भामध्ये मिहान प्रकल्पामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शरद पवारांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, त्यासाठी संपूर्ण डिटेल्स देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली. या प्रकल्पामुळे विदर्भातील रोजगारात वाढ होईल."
ही चर्चा करताना मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं. ते म्हणाले की, "मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नाही."
माध्यमांनी अनिल देशमुख यांना मुंबई पोलीस आयुक्तांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदलीच्या विषयावर विचारल्यानंतर त्याला उत्तर देण्याचं गृहमंत्र्यांनी टाळलं.
मुंबई पोलीस आयुक्तांची बदली ही रुटीन नाही. चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्या अक्षम्य आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही बसून निर्णय घेतला की, चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी त्यांना बाजूला केलं असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी स्पष्ट केलं होतं.
मुंबई पोलीस आयुक्तांची बदली रुटीन नव्हती, काही चुका अक्षम्य होत्या म्हणून बदली : अनिल देशमुख