एक्स्प्लोर

Sachin Vaze | 'त्या' दिवसांपर्यंत सचिन वाझे सतत मनसुख हिरण यांच्याशी संपर्कात, सीडीआरमधून माहिती

Antilia Explosives Scare प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे तसेच यामध्ये नेमकी काय चौकशी केली जात आहे याची सारी डिटेल्स सचिन वाझे (Sachin Vaze) घेत असल्याचं त्यांच्या सीडीआरमधून स्पष्ट झालं आहे.

मुंबई :  रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ आढळल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास  NIA आणि ATS करत होती. त्यावेळी सचिन वाझे हे मृत मनसुख हिरणच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांच्या सीडीआरमधून उघडकीस आली आहे. 

हा तपास सीआययूकडे असताना या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालला आहे तसेच यामध्ये नेमकी काय चौकशी केली जात आहे याची सारी डिटेल्स सचिन वाझे घेत असल्याचं त्यांच्या सीडीआरमधून स्पष्ट झालं आहे. 

सचिन वाझे यांच्या सीडीआरमधून हेही समोर आलंय की 3 आणि 4 मार्च म्हणजे मनसुख हिरण यांच्या गायब होण्याच्या दिवसापर्यंत ते सातत्याने हिरण यांच्या संपर्कात होते. त्याच वेळी क्राईम ब्रॅन्चचे नितिन अलक्नुरे या प्रकरणाचा तपास करत असल्याने वाझे यांच्या हातातून हा तपास काढून घेण्यात आला. त्याचवेळी NIA आणि ATS सातत्याने मनसुख हिरण यांची चौकशी करत होती. 

आता सचिन वाझेंच्या हातून हा तपास काढून घेण्यात आल्यानंतर सचिन वाझे आणि मनसुख हिरण यांच्यामध्ये त्या दोन दिवसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे ATS ला जाणून घ्यायचं आहे. ATS ने याबाबत सचिन वाझे यांची या आधी चौकशी केली आहे पण वाझे यांनी दिलेल्या उत्तरावर ATS समाधानी नसल्याचं समजतंय. 

'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको' सचिन वाझे यांची कोर्टात नवी याचिका

वाझे यांनी मनसुख हिरण यांच्याकडून 2 मार्चला पत्र का लिहून घेतलं आणि त्या पत्रानंतर मनसुख हिरण यांचा मृत्यू झाला. ते पत्र लिहून घेणं म्हणजे मनसुख याच्या मृत्यूचे नियोजन करण्यात आलं होतं का असा प्रश्नही ATS ला पडला आहे. आता या प्रश्नांची उत्तरं ATS शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 

एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे  यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांनी तपासाच्या नावाखाली ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्ड्स, सीसीटीव्हा फुटेज जप्त केले होते. मात्र या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकॉर्डवर घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसुख हिरण प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा कोणताही रेकॉर्ड ठेवण्यात आला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुकानदाराने वाझे आणि त्याच्या पथकाने दुकानातील CCTV, डीव्हीआर मशीन, रेकॉर्ड नेल्याचे कबूल केलं आहे. या संपूर्ण घटनेची आता गंभीर दखल ही घेण्यात आली असून या प्रकरणी CIU च्या अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. 

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली रुटीन नव्हती, काही चुका अक्षम्य होत्या म्हणून बदली : अनिल देशमुख

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget