एक्स्प्लोर

असीमानंदांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा नामंजूर!

हैदराबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांचा राजीनामा नामंजूर केला.

हैदराबाद: हैदराबादच्या न्यायाधीशांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. हैदराबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांचा राजीनामा नामंजूर करत, त्यांनी मागितलेली 15 दिवसांची सुट्टीही रद्द केली. इतकंच नाही तर त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. निकालानंतर तातडीने राजीनामा न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी सोमवारी हैदराबादेतील मक्का मस्जिद खटल्यातील आरोपी असीमानंद यांच्यासह सर्वांना निर्दोष ठरवलं होतं. त्यानंतर काही तासातच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. रवींद्र रेड्डी यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला होता. त्याआधी त्यांनी 11 वर्ष जुना मक्का मस्जिद स्फोटप्रकरणी स्वामी असीमानंदसह 5 जणांना निर्दोष ठरवलं होतं. त्यामुळे रेड्डी यांच्यावर निकालासाठी दबाव होता का, त्या दबावातूनच त्यांनी राजीनामा दिला का, असे प्रश्न विचारले जात होते. न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांची  न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली हायकोर्टाच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे. न्यायाधीश रेड्डी यांच्याविरोधात कृष्णा रेड्डी नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. कृष्णा यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, त्यांच्यावर 12 डिसेंबर 2017 रोजी हायकोर्टात तक्रार दाखल केली. न्यायाधीश रेड्डी यांनी टी पी रेड्डी नावाच्या आरोपीला पैसे घेऊन जामीन दिल्याचा आरोप, कृष्णा रेड्डी यांनी केला आहे. हैदराबाद स्फोट 18 मे 2007 रोजी हैदराबादमधल्या मक्का मशिदमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. स्थानिक पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला. एनआयएला पुरावे गोळा करण्यात अपयश आल्याचं कारण देत असीमानंद यांची सुटका करण्यात आली. संबंधित बातम्या

राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget