एक्स्प्लोर

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : धनुष्यबाणाच्या निकालानंतर आता कोर्टातल्या लढाईचं काय होणार?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या संघर्षाचा नवा अंक उद्यापासून सुप्रीम कोर्टात सुरु होत आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचा निकाल दिल्यानंतर या संघर्षाला एक नवी धार येणार आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) उद्यापासून (21 फेब्रुवारी) पुन्हा शिंदे विरुद्ध ठाकरे लढाई सुरु होणार आहे. तशी लढाई तर आधीपासूनच सुरु होती. पण आता धनुष्यबाण शिंदेंना देत खरी शिवसेना (Shiv Sena) ही शिंदेंची शिवसेना हे केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्य केल्यानंतर या संघर्षाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाचे नेमके काय परिणाम कोर्टात होतात, कोर्ट त्यावर काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज (20 फेब्रुवारी) सकाळी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ही याचिका मेन्शन करण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने आज काही ऐकण्यास नकार दिला. उद्या मेन्शनिंगच्या यादीत रीतसर अर्ज करुन ही याचिका मांडा असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयात सुप्रीम कोर्ट काही दखल देणार का हेही पाहावं लागेल. कारण 1968 च्या सादिक अली केसमध्ये निवडणूक आयोगाचा याबाबतचा अधिकार सर्वोच्च असल्याचं सुप्रीम कोर्टानेच मान्य केलं होतं. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सुप्रीम कोर्टात धनुष्यबाणाच्या निकालाचे काय पडसाद?

  • कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती द्यावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे
  • सप्टेंबर 22 मध्ये याच घटनापीठाची स्थापना झाल्यावरही निवडणूक आयोगाची कार्यवाही कोर्टाच्या निकालापर्यंत थांबवण्याची विनंती केली गेली होती, पण याच पीठाने आयोगाला निर्णयाची परवानगी दिली होती
  • शिवसेना हा पक्ष शिंदेचाच आहे यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं, मग सुप्रीम कोर्टात पक्षांतर बंदीसारख्या मुद्द्यावरच्या चर्चांवर कोर्ट काय वेगळा निर्णय देणार?
  • 21, 22 आणि 23 फेब्रुवारी असे उद्यापासूनचे सलग तीन दिवस कोर्टाने सुनावणीसाठी राखीव ठेवले आहेत

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचं प्रकरण

सुप्रीम कोर्टाने मागच्या आठवड्यात सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायमूर्तींकडे द्यायचं की नाही यावर सलग तीन दिवस सुनावणी घेतली. मात्र त्यानंतरही हा निर्णय काही झाला नाही. आता या सगळ्या मुख्य प्रकरणाची सुनावणी सुरु होत असतानाच धनुष्यबाणाचाही निकाल आलेला आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे. 

याच घटनापीठाने निवडणूक आयोगाला निर्णयाची मुभा दिलेली होती. मग आता तेच कोर्ट पुन्हा आयोगाच्या निकालाला स्थगिती देईल का ही शंकाच आहे. उद्या एकतर ठाकरे गटाला आधी हायकोर्टात जायला सांगू शकतं कोर्ट किंवा महाराष्ट्राच्या इतर प्रकरणांसोबत हे प्रकरण जोडलं जाऊ शकतं. आयोगाच्या निकालाला कोर्टाने अमान्य केल्याचं एकही उदाहरण नसताना आता या प्रकरणात काय होतं उद्यापासून कळेल. 

VIDEO : Thackeray vs Shinde : ठाकरे गटाची याचिका तातडीनं दाखल करून घेण्यास कोर्टाचा नकार

संबंधित बातमी

पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका; 'सुनावणीसाठी उद्या या', तातडीनं सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari  Akola : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर;मिटकरींचा दावाDevendra Fadnavis Jamner : जामनेरमध्ये महाजनांपेक्षा त्यांच्या पत्नीलाच जास्त मतं मिळतील - फडणवीसTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :12 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget