एक्स्प्लोर

पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका; 'सुनावणीसाठी उद्या या', तातडीनं सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Supreme Court: निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)  मिळालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court)  धाव घेतली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टानं आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. त्यावर कोर्टाने त्यांना उद्या मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे. 

Lawyer of Uddhav Thackeray faction mentions plea before Supreme Court, challenging Election Commission's move to allot party name "Shiv Sena" and the symbol "Bow and Arrow" to the faction led by Maharashtra CM Eknath Shinde.

Supreme Court asks the lawyer to mention it tomorrow. pic.twitter.com/HQOh4pbWrp

— ANI (@ANI) February 20, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने आज निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "न्यायालयाचा निर्णय येण्याआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाही

तीन दशकांपासून शिवसेनेची ओळख, शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण तर ठाकरेंकडून हिरावलं गेलं. चिन्हच नव्हे तर शिवसेना हा पक्षही शिंदेना मिळाला. पण आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाहीय. ठाकरेंच्या पक्षाला नव्या नावासाठी, नव्या चिन्हासाठीही संघर्ष करावा लागणार आहे.  चिन्हाबाबत वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला दिलेलं मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तात्पुरतं होतं.  निकालात आयोगानं स्पष्ट म्हटलं आहे की हे तात्पुरतं नाव, चिन्ह कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक संपेपर्यंतच त्यांना वापरता येईल. पुन्हा मशाल मिळवण्यासाठी, नव्या पक्षाच्या नावासाठी त्यांना नव्यानं प्रक्रिया करावी लागणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Shiv Sena Party Office : विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवलेParbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जParbhani Protest : परभणी जिल्हा बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी पेटवले पाईपRahul Patil on Parbhani Protest :  परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
निष्काळजीपणाची हद्द! अहवाल येण्यापूर्वीच 8.5 हजार रुग्णांच्या पोटात बनावट गोळ्या, औषध यंत्रणाच उठली जीवावर?
Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
Embed widget