एक्स्प्लोर
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची टी-पार्टी, व्हिडीओ व्हायरल
एका घरात दहशतवाद्यांची टी-पार्टी सुरू असल्याचं दिसतं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं कळतं आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एके 47सह बसलेले दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून मोठा कट रचत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे.
या व्हिडीओमध्ये एका घरात दहशतवाद्यांची टी-पार्टी सुरू असल्याचं दिसतं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं कळतं आहे.
लष्करचा कमांडर दुजाना जरी मारला गेला असला तरी 48 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर घुसखोरी केल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना नीट पाहा. जर तुम्हाला हे चेहरे कुठे दिसले तर पोलिसांना कळवा.
दरम्यान, लष्कर-ए-तोयबचा चीफ कमांडर अबु दुजानाचा भारतीय जवानांनी खात्मा केला. यानंतर काश्मीरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे.
काश्मीर खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, कालच्या हिंसक घटना आणि दगडफेकीनंतर काश्मीर खोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement