एक्स्प्लोर
पत्रकार शुजात बुखारींच्या आणखी एका मारेकऱ्याचा खात्मा
यंदा फेब्रुवारी महिन्यात श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंह रुग्णालयात लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला करुन अबू हंजूला उर्फ नवीद जटची सुटका केली होती. या हल्ल्यात दोन पोलीसही शहीद झाले होते.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ पत्रकार आणि रायझिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कर ए तोयबाचा दहशतवादी नवीद जटचा भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कंठस्नान घातलं. 14 जून रोजी श्रीनगरच्या प्रेस एन्क्लेव्ह परिसरात दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती.
दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी बडगामच्या कठपोरा परिसरात सर्च ऑपेरशन केलं आणि वेढा घातला. यानंतर दहशतवादी आणि जवानांवर चकमक सुरु झाली, ज्यात नवीदला ठार मारण्यात आलं. सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासनाने बडगाममधील इंटरनेट सेवा बंद केली आहे. याआधी बुखारी हत्याकांडमध्ये सामील असलेला दहशतवादी आझाद मलिकला यापूर्वीच अनंतनागमध्ये एका चकमकीत ठार केलं होतं.
यंदा फेब्रुवारी महिन्यात श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंह रुग्णालयात लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला करुन अबू हंजूला उर्फ नवीद जटची सुटका केली होती. या हल्ल्यात दोन पोलीसही शहीद झाले होते.
रुग्णालयातून पळ
लष्कर ए तोयबाचा पाकिस्तानी दहशतवादी नवीद जटला 2014 मध्ये दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधून अटक करण्यात आली होती. नवीद श्रीनगर सेंट्रल जेलमध्ये कैद होता. एका सुनियोजित हल्ल्यानुसार नवीदने पोटदुखीची तक्रार केली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सहा कैद्यांना सेंट्रल जेलमधून रुग्णालयात आणलं होतं. यापैकीच एका कैद्याने पोलिसांच्या हातातून शस्त्र हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला आणि नवीदची सुटका केली होती.
नवीद हा कमांडर कासिमचा उजवा हात
2011 मध्ये लष्कर ए तोयबामध्ये सामील झालेला नवीद काश्मीर खोऱ्यात सक्रिय होता. श्रीनगरच्या हैदरपुरामध्ये सैन्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये पोलीस आणि सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यात त्याचा समावेश होता. 2014 मध्ये त्याला कुलगाममधून अटक करण्यात आली होती. नवीद हा लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू कासिमचा उजवा हात होता. भारतीय जवानांनी कासिमला 2015 मध्ये कुलगाममध्येच कंठस्नान घातलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement